Mumbai Pune Train Cancel | मुंबई-पुणे रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्वाची बातमी, पावसामुळे ‘या’ ट्रेन रद्द

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Mumbai Pune Train Cancel | मुंबई-पुणे प्रवास कराणाऱ्या प्रवाशांसाठी महत्वाची बातमी आहे. मुंबई विभागात (Mumbai Region) पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे (Heavy Rain) काही भागात पाणी साचले आहे. पावसाचे पाणी रेल्वे मार्गावर आल्याने मुंबई-पुणे किंवा पुणे -मुंबई धावणाऱ्या रेल्वे गाड्या रद्द (Mumbai Pune Train Cancel) करण्यात आल्या आहेत. आज (19 जुलै) आणि उद्या (20 जुलै) या रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना त्रास सहन करावा लागणार आहे.

रद्द करण्यात आलेल्या ट्रेनमध्ये डेक्कन क्विन (Deccan Quin), सिंहगड एक्सप्रेस (Sinhagad Express), इंद्रायणी एक्सप्रेस (Indrayani Express), डेक्कन एक्सप्रेस (Deccan Express) आणि इंटरसिटी (Intercity) या पुणे-मुंबई धावणाऱ्या ट्रेनचा समावेश आहे. या ट्रेन पुणे-मुंबई दररोजचा प्रवास करणाऱ्या नोकरदार वर्गासाठी महत्वाच्या आहेत. परंतु मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक परिसरात रेल्वे रुळावर पाणी साचले आहे. त्यामुळे या ट्रेन रद्द (Mumbai Pune Train Cancel) करण्यात आल्याचे रेल्वे विभागाकडून सांगण्यात आलं आहे.

पावसामुळे ‘या’ ट्रेन रद्द

1) डेक्कन क्विन- 12123 सीएसएमटी-पुणे 19.7.23 आणि 12124 पुणे-सीएसएमटी 20.7.23
2) सिंहगड एक्सप्रेस- सीएसएमटी -पुणे 19.07.23 आणि 11010 पुणे-सीएसएमटी 20.07.23
3) डेक्कन एक्सप्रेस- पुणे-सीएसएमटी 19.07.23 आणि 11007 सीएसएमटी-पुणे 20.07.23
4) इंटरसिटी- पुणे-सीएसएमटी 19.07.23 आणि 12127 सीएसएमटी-पुणे 20.07.23
5) इंद्रायणी- पुणे-सीएसएमटी 19.07.223 आणि 22105 सीएसएमटी-पुणे 20.07.23

Web Title :   Mumbai Pune Train Cancel | deccan queen indrayani deccan express intercity sinhagad express mumbai pune train cancelled due to heavy rain

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा