जॉन अब्राहम-इमरान हाश्मीच्या ‘मुंबई सागा’चा टीझर रिलीज; सुनील शेट्टीची दमदार ‘वापसी’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहमचा आगामी चित्रपट ‘मुंबई सागा’ चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. खुद्द जॉन अब्राहम याने हा टीझर सोशल मीडियावर शेअर केला आहे. टीझरमध्ये जॉन अब्राहम आणि इमरान हाश्मी यांच्यातील जबरदस्त सीन दाखविले आहेत.

टीझरमध्ये इमरान हाशमीचा ’मैं उमीद पर नहीं जीद पर जितता हूँ । ’ हा डायलॉग चाहत्यांना खूप आवडला आहे. या चित्रपटात जॉन अब्राहम डॉनच्या भूमिकेत दिसला आहे. दिग्दर्शक संजय गुप्ता यांनी या चित्रपटात अनेक बड्या कलाकारांना साइन केले आहे. या दोन व्यतिरिक्त, प्रितीक बब्बर, जॅकी श्रॉफ, रोनित रॉय, सुनील शेट्टी आणि गुलशन ग्रोव्हर यांचीही झलक टीझरमध्ये दाखविण्यात आली आहे.

पूर्वी वृत्त असे होते की, ‘मुंबई सागा’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होईल. रिपोर्ट्सनुसार या चित्रपटाचे हक्क अ‍ॅमेझॉन प्राइमला विकले गेले होते. पण, त्यानंतर हे प्रकरण काही चालले नाही आणि आता पुढच्या महिन्यात हा चित्रपट थिएटरमध्ये दाखविण्याच्या तयारीत आहे.

हा चित्रपट 19 मार्च 2021 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होईल. ‘मुंबई सागा’ चित्रपट हा 80 च्या दशकाच्या कहानीवर आधारित गँगस्टर फिल्म आहे. हा चित्रपट मुंबईवर आधारित आहे.

कोरोना विषाणूमुळे चित्रपटसृष्टीवरही मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे. त्यामुळे गल्ले भरणारे चित्रपट आता मागे पडले आहेत. आता हळूहळू स्थिती सामान्य होत आहे. त्यामुळे आता तरी चित्रपटगृह सुरू झाले असून याला प्रेक्षक किती प्रतिसाद देतात हे पाहूया.