मुंबई : Mumbai Suburban District Level Youth Award | क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी, मुंबई उपनगर यांच्याद्वारे सन २०२१-२२ या वर्षाच्या जिल्हा युवा पुरस्कारांकरिता मुंबई उपनगर जिल्ह्यातील युवक, युवती आणि युवकांसाठी कार्य करणाऱ्या सामाजिक संस्थांकडून जिल्हास्तर युवा पुरस्कारांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. (Mumbai Suburban District Level Youth Award)
जिल्ह्यातील युवकांनी व सामाजिक संस्थांनी केलेल्या समाजहिताच्या कार्याचा गौरव व्हावा व युवा विकासाचे कार्य करण्याकरीता त्यांना प्रोत्साहन मिळावे, म्हणून जिल्हा युवा पुरस्कार देण्यात येतात. सन २०२१-२२ या वर्षाकरिता प्रत्येकी १ युवक, युवती आणि संस्था असे एकूण ३ पुरस्कार देण्यात येणार आहेत. विहीत नमुन्यात अर्ज जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाचा ब्लॉग dsomumbaisub.blogspot.com येथे उपलब्ध आहेत. (Mumbai Suburban District Level Youth Award)
पुरस्कार पात्रतेचे निकष असे :-
(अ) युवक/युवती पुरस्कार –
(१) पुरस्कार वर्षाच्या १ एप्रिल रोजी पुरस्काराथींचे वय १३ वर्षे पूर्ण असावे, तसेच ३१ मार्च रोजी वय ३५ वर्षांच्या आत असावे.
(२) अर्जदार हा मुंबई उपनगर जिल्ह्यात सलग ५ वर्ष वास्तव्यास असावा.
(३) अर्जदाराने केलेल्या कार्याचे सबळ पुरावे अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. वृत्तपत्र कात्रणे, प्रशस्तीपत्रे, चित्रफिती, छायाचित्रे जोडावेत. (गल्या तीन वर्षांच्या १ जून ते ३१ मे या कालावधीतील कार्याबाबतच्या माहितीसह सादर करावेत.).
(४) केंद्र, राज्य शासनाच्या शासकीय व निमशासकीय कार्यालयातील अधिकारी/कर्मचारी विद्यापीठ अंतर्गत महाविद्यालयातील प्राध्यापक/कर्मचारी पुरस्कारासाठी पात्र राहणार नाहीत.
(ब) संस्था युवा पुरस्कार –
(१) संस्थेची नोंदणी झाल्यानंतर संस्था ५ वर्षे कार्यरत पाहिजे. (२) संस्था सार्वजनिक विश्वस्त अधिनियम १८६० किंवा मुंबई पब्लिक ट्रस्ट अॅक्ट १९५० नुसार नोंदणीकृत असावी.
(३) गुणांकरिता संस्थेने केलेल्या कार्याची वृत्तपत्रे कात्रणे, प्रशस्तीपत्रे, चित्रफिती, छायाचित्रे जोडावेत. असावी.
वरीलप्रमाणे पुरस्काराकरिता इच्छुकांनी विहीत नमुन्यातील अर्ज दि. ५ एप्रिल २०२३ पर्यंत सुट्टीचे दिवस वगळून कार्यालयीन वेळेत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मुंबई उपनगर, शासकीय शारीरिक शिक्षण महाविद्यालय परिसर, संभाजीनगर समोर, आकुर्ली रोड, कांदिवली (पूर्व), मुंबई- ४००१०१ येथे सादर करावेत. अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक ०२२-२८८७११०५ यावर संपर्क साधावा, असे जिल्हा क्रीडा अधिकारी, मुंबई उपनगर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.
Web Title :- Mumbai Suburban District Level Youth Award | Invitation to send proposals for Mumbai Suburban District Level Youth Awards
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
MLA Sanjay Shirsat | आमदार संजय शिरसाट भडकले; म्हणाले – ‘जशास तसे उत्तर देणार, आमदारकी गेली उडत’