‘अजमल कसाब’ला जिवंत पकडणाऱ्या पोलिस निरीक्षकासह सहाय्यक निरीक्षक ‘तडकाफडकी’ निलंबीत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मुंबई दहशतवादी हल्ल्यातील दहशतवादी अजमल कसाब याला जिवंत पकडणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला मुंबई पोलीस आयुक्तांनी निलंबित केले आहे. पोलीस निरीक्षक संजय गोविलकर आणि अन्य एक सहाय्यक पोलीस निरीक्षक जितेंद्र सिंगोट यांना निलंबित करण्यात आले आहे. दोघानांही दाऊदच्या गॅंगमधील सोहेल भामला याला सोडल्याप्रकरणी निलंबित करण्यात आले आहे. सोहेल याच्याविरुद्ध लूक आऊट नोटीस जारी करण्यात आली होती. त्यानंतर त्याला मुंबई विमानतळावर ताब्यात घेण्यात आले होते.

EOW मध्ये कार्यरत असणाऱ्या या दोन्ही अधिकाऱ्यांनी त्याला अटक करून कार्यालयात आणले. मात्र त्याची तपासणी केल्यानंतर त्याला सोडून दिले. त्यानंतर सोहेल पुन्हा भारताबाहेर पळून जाण्यास यशस्वी झाला. त्यामुळे निष्काळजीपणे वागल्यामुळे मुंबई पोलीस आयुक्तांनी या दोघांवर कारवाई करत निलंबित केले आहे. त्याचबरोबर या दोघांची चौकशी देखील करण्यात येणार आहे.

दरम्यान, २००८ मध्ये मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यावेळी पोलीस निरीक्षक संजय गोविलकर हे गिरगाव चौपाटीवर तैनात होते. त्यावेळी गाडीतून येणाऱ्या कसाब आणि इस्माइल या दोन दहशतवाद्यांना पकडतेवेळी तुकाराम ओंबळे यांनी कसाबला जिवंत पकडले होते. तर इस्माईल याला संजय गोविलकर यांनी शूट केले होते. त्यानंतर संजय गोविलकर यांना राष्ट्रपती शौर्य पदकाने गौरवण्यात देखील आले होते.

आरोग्यविषयक वृत्त –