शहरातील मैदाने मनपा कर्मचाऱ्यांकडूनच साफसफाई करुन घ्या : मनपा क्रिडा समिती सदस्य प्रविण चोरबेले यांची मागणी

पुणे- पुणे महापालिकेच्या ताब्यात असलेल्या मैदानावर सध्या गवत मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. लॉकडाऊनमुळे या मैदानांची देखभाल करणार्‍या ठेकेदारांचीच बीले अडकली असल्याने त्यांचे दुर्लक्ष झालेले आहे. त्यामुळे महापालिकेने स्वतःचे कर्मचारी कामाला लावुन या मैदानांची साफसफाई करावी. याबाबत महापालिका आयुक्‍तांना ही निवेदन देणार असून त्यामध्ये ही मागणी करणार असल्याची माहिती महापालिकेच्या क्रीडा समितीचे सदस्य प्रवीण चोरबेले यांनी सांगितले.

शहराच्या मध्यवर्ती भागात नेहरू स्टेडियम तथा तळजाई सारखी खेळाची मैदाने आहेत. या मैदानांवर आता पर्यंत हजारो रणजी व राष्ट्रीय खेळाडू निर्माण झाले आहेत. परंतु लॉकडाउन च्या काळात या मैदानां ची दूर-अवस्था झाली आहे. सर्वत्र गवत वाढले आहे. मैदानावर हिरवळ गायब झाली असुन सगळी कडे पिवळे गवत उगवले आहे. त्याच प्रमाणे मैदाना च्या प्रेषक गैलरीत ही सर्वत्र धूळ व कचरा जमा झाला है. खिडक्यांच्या काचा ही तुटलेल्या अवस्थेत आहे. अशा प्रकारे पुणे मनपा द्वारे या मैदाना वर लाखो रुपये खर्च करुन ही, निट देखभाल न केल्याने हे पैसे मातीमोल ठरत आहेत.