Muralidhar Mohol-Sanskriti Pratishthan | संस्कृती प्रतिष्ठान, शि. प्र. मंडळीतर्फे डॉ. कुमार विश्वास यांच्या ‘अपने अपने राम’ कार्यक्रमाचे 18 ते 20 जानेवारीला आयोजन (Video)

मुरलीधर मोहोळ यांची माहिती; लाखो पुणेकर रामभक्तांना घेता येणार रामकथेचा आस्वाद

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Muralidhar Mohol-Sanskriti Pratishthan | अयोध्येतील रामजन्मभूमीवर शेकडो वर्षांच्या प्रतीक्षेनंतर प्रभू श्रीरामांचे मंदिर साकारत असून, रामलल्लाच्या बाल्यावस्थेतील मूर्तीची येत्या २२ जानेवारीला प्राणप्रतिष्ठा होत आहे. यानिमित्ताने देशभरातील वातावरण राममय झाले आहे. सर्वत्र आनंद, उत्साह पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर संस्कृती प्रतिष्ठान आणि शिक्षण प्रसारक मंडळी यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. कुमार विश्वास (Dr Kumar Vishwas) यांच्या अमोघ वाणीतून ‘अपने अपने राम’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या १८ ते २० जानेवारी २०२४ या कालावधीत टिळक रस्त्यावरील एसपी कॉलेजच्या मैदानावर या रामकथेचा आस्वाद घेता येणार आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य असणार आहे, अशी माहिती संस्कृती प्रतिष्ठानचे संस्थापक, माजी महापौर, भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ यांनी पत्रकार परिषदेत दिली. हॉटेल श्रेयस येथे झालेल्या पत्रकार परिषदेवेळी भारतीय जनता पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र माध्यमप्रमुख अमोल कविटकर, निलेश कोंढाळकर आदी उपस्थित होते. (Muralidhar Mohol-Sanskriti Pratishthan)

मुरलीधर मोहोळ म्हणाले, “अखंड हिंदुस्थानातील रामभक्तांसाठी ऐतिहासिक असा सोहळा येत्या २२ जानेवारीला रामजन्मभूमी अयोध्या येथे पार पडत आहे. याच आनंद सोहळ्यात भर घालण्यासाठी १८, १९ व २० जानेवारी २०२४ रोजी सायंकाळी ६ ते ९ या वेळेत डॉ. कुमार विश्वास यांच्या ओघवत्या शैलीत, अमोघ वाणीत श्रीराम कथेचे आयोजन केले आहे. कार्यक्रमाच्या ठिकाणी राममंदिराची प्रतिकृती असलेले व्यासपीठ असणार आहे. १८ जानेवारी रोजी औपचारिक उद्घाटन होणार असून, कार्यक्रमादरम्यान समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. डॉ. कुमार विश्वास यांची रामकथा सांगण्याची अनोखी शैली असून, पुणेकर नागरिक, राम भक्तांसाठी ही एक पर्वणी असणार आहे.” (Muralidhar Mohol-Sanskriti Pratishthan)

“कार्यक्रमात येणाऱ्या रामभक्तांना कोणतीही अडचण येणार नाही, याची काळजी घेतली जात असून, ८०-९० हजार
लोकांची आसनव्यवस्था केली जाणार आहे. त्यामध्ये भारतीय बैठक व खुर्च्या असणार आहेत.
नागरिकांची प्रवासाची, पार्किंगची गैरसोय होऊ नये, तसेच वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलिस अधिकाऱ्यांशी चर्चा सुरु आहे.
फिरते शौचालय, प्रथमोपचार, अग्निशामकदल, पाण्याची सुविधा येणाऱ्या नागरिकांसाठी उपल्बध करून दिली जाणार आहे.
त्यामुळे तीन दिवस चालणाऱ्या ‘अपने अपने राम’ कार्यक्रमासाठी अधिकाधिक रामभक्तांनी उपस्थित राहावे,”
असे आवाहनही मुरलीधर मोहोळ यांनी केले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

अफ्रिकन नागरिकाकडून मेफेड्रोन व मेथाक्युलोन अंमली पदार्थ जप्त, पुणे गुन्हे शाखेची कारवाई

पुणे : मंडळ अधिकाऱ्यांकडे केलेला हरकत अर्ज मागे घेण्यासाठी खंडणीची मागणी, दोघांवर FIR

चालकाला कोयत्याने मारहाण करुन लुटले, दहशत माजवणाऱ्या दोघांना अटक; भोसरी येथील घटना

Radha Krishna Vikhe Patil | तलाठी भरती : मंत्री राधाकृष्ण विखे यांचा विरोधकांना थेट इशारा, सरकारची बदनामी केली तर गुन्हे दाखल करू!

Comedian Navin Prabhakar | कॉमेडियन नवीन प्रभाकर याचा 14 जानेवारीला खास शो रंगणार

Congress Mohan Joshi On Pune Metro | मेट्रो मार्ग तातडीने पूर्ण करा ! संयमाचा अंत पाहू नका, विमानतळापर्यंत मेट्रो सेवा करा – माजी आमदार मोहन जोशी