Murder in Chakan | हॉटेलमधील कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याच्या रागातून तरुणाचा खून, तर एकावर खुनी हल्ला

पुणे न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –  हॉटेलमध्ये काम करणाऱ्या कुक (hotel cook) आणि मॅनेजरला मारहाण (beating) केल्याच्या रागातून एका तरुणाचा खून केल्याची घटना चाकणमध्ये (Murder in Chakan) घडली आहे. तर एका तरुणावर खुनी हल्ला (Murder in Chakan) करण्यात आला आहे. ही घटना सोमवारी (दि.9) रात्री अकराच्या सुमारास पुणे-नाशिक रोडवर (Pune-Nashik road) वाकी गावच्या हद्दीत भामा नदीच्या पुलाजवळ घडली. याप्रकरणी चाकण पोलिसांनी (Chakan police) दोघांना अटक (Arrest) केली आहे.

हेमंत संतोष सुतार असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.
तर सुरज विठ्ठल वाळुंज (वय-28 रा. ठाकूर पिंपरी, ता.खेड) याच्यावर खुनी हल्ला झाला असून त्यांनी चाकण पोलीस ठाण्यात (Chakan Police Station) फिर्याद दिली आहे
. वाळुंज यांच्या फीर्यादीवरुन चाकण पोलिसांनी हॉटेल मालक ऋतिक अतुल वहिले (Hrithik Atul vahile) (वय-22), मयूर बाळासाहेब येवले (Mayur Balasaheb Yewale)
(वय-20 दोघे रा. सुंबरेनगर, वाकी खुर्द, ता. खेड) यांना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत आणि फिर्यादी हे मित्र आहेत.
दोघेजण आरोपीच्या हॉटेलमध्ये गेले होते.
त्याठिकाणी त्यांचे हॉटेलमधील कुक आणि मॅनेजर यांच्या सोबत भांडण झाले. हेमंत याने हॉटेलच्या कुक आणि मॅनेजरला मारहाण केली.
याचा राग आरोपींच्या मनात होता.
सोमवारी रात्री अकराच्या सुमारास फिर्यादी सुरज आणि मयत हेमंत हे दोघेजण पुणे-नाशिक रोडने दुचाकीवरून जात होते.

 

हॉटेलमधील कुक आणि मॅनेजरला माराहाण केल्याच्या रागातून हॉटेल मालक ऋतिक याने विरुद्ध दिशेने येऊन ब्रीझा गाडीची (Breeze car) धडक दुचाकीला दिली.
यामुळे दुचाकीवरील सुरज आणि हेमंत हे दोघे खाली पडले.
आरोपी ऋतिक याने कारचे चाक फिर्यादी सुरज याच्या पायावर घालून खुनाचा प्रयत्न केला.
त्यानंतर आरोपींनी तलवार आणि लाकडी दांडक्याने हेमंतला मारहाण करुन त्याचा निर्घृण खून केला.
पुढील तपास चाकण पोलीस करीत आहेत.

 

Web Title : Murder in Chakan | Murder of a young man out of anger over the beating of hotel staff, while a murderous attack on one

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Weight Loss Tips | लठ्ठपणा कमी करण्यासाठी ‘हे’ सोपे उपाय

Neeraj Chopra | नीरज चोप्रासाठी केलेल्या ट्वीटमुळे ‘बिग बीं चांगलेच चर्चेत, ‘या’मुळे होतायेत ट्रोल

MRNA Vaccine | खूशखबर! कोविडसाठीची एमआरएनए लस कॅन्सरवरही उपयोगी; जर्मन बायोटेक्नॉलॉजी कंपनी बायोनटेकचे संशोधन