Murlidhar Mohol Criticize Aditya Thackeray | पुण्यातील विकास प्रकल्पांचा ‘कांजूरमार्ग’ होऊ देणार नाही!, मुरलीधर मोहोळ यांनी आदित्य ठाकरेंना सुनावलं

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Murlidhar Mohol Criticize Aditya Thackeray | बालभारती-पौड फाटा रस्ता (Balbharti-Paud Phata Road) नदीकाठसुधार प्रकल्पामुळे (Pune River Rijuvenation Project) पर्यावरणाची हानी होणार असल्याचा दावा करत पुण्यातील पर्यावरण प्रेमींनी या प्रकल्पांना विरोध केला आहे. या पार्श्वभूमीवर आमदार आदित्य ठाकरे (MLA Aaditya Thackeray) यांनी वेताळ टेकडीवर (Vetal Tekdi) जाऊन नागरिकांचे म्हणणे ऐकून घेतले. तसेच नागरिकांना नको असलेला विकास कशासाठी असा प्रश्न उपस्थित करत प्रकल्प रद्द करण्याची मागणी गेली होती. यावरुन पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ (Pune Former Mayor Murlidhar Mohol) यांनी आदित्य ठाकरे यांना प्रत्युत्तर देताना चांगलेच सुनावले आहे. पुण्यातील विकास प्रकल्पांचा ‘कांजूरमार्ग’ (Kanjurmarg) होऊ देणार नाही. कधीतरीच पुण्यात प्रकटून पुणेकरांबद्दलची खोटी आणि संधीसाधू तळमळ दाखवू नका, अशी टीका मुरलीधर मोहोळ यांनी केली आहे. (Murlidhar Mohol Criticize Aditya Thackeray)

 

 

पुण्यातील विकास प्रकल्पांचा पुण्यातील विकास प्रकल्पांचा ‘कांजूरमार्ग’ होऊ देणार नाही असे नमूद करत मुरलीधर मोहोळ म्हणाले, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे (Shiv Sena UBT) आदित्य ठाकरेंनी मुंबईतील आरे कारशेडचे काम थांबवून कांजूरमार्गच्या जागेवर तीन मेट्रो लाईन्सच्या कारशेडचा अत्यंत अव्यवहार्य पर्याय निवडला होता. स्वतःच्या ‘इगो’पायी मुंबईकरांच्या डोक्यावर 10 हजार कोटींचा बोजा आला. (Murlidhar Mohol Criticize Aditya Thackeray)

 

पर्यावरणाचं रक्षण आणि ज्वलंत नागरी प्रश्नांची सोडवणूक यांचा समतोल न राखता येणाऱ्यांनी पुण्यात येऊन अर्धवट आणि चुकीच्या माहितीच्या आधारे काहीही बोलावे, हा मोठा विनोद आहे. आदित्य ठाकरेजी, मी स्वतः पुण्याचा महापौर राहिलेलो आहे. तुमच्यापेक्षा पुण्याची, पुणेकरांच्या नागरी प्रश्नांची आणि पर्यावरणाची आपल्यापेक्षा अधिक जाण आणि तळमळ आहे. कधीतरीच पुण्यात प्रकटून पुणेकरांबद्दलची खोटी आणि संधीसाधू तळमळ दाखवू नका.

 

नदीकाठसुधार आणि बालभारती-पौडफाट रस्ता हे दोन्ही विकास प्रकल्प पर्यावरणाची काळजी घेऊनच पुढे नेण्यात येत आहेत.
तरीही यावर काही पुणेकरांचे आक्षेप असल्यावर त्यावर निश्चितच सुचनांचा विचार करुन पुढे जाऊ.
पण बालभारती-पौडफाटा रस्ता रद्दच करण्याची मागणी करण्याचा आदित्य यांना नैतिक अधिकार काय?
केवळ विरोधाला विरोध म्हणून राजकारण करण्याच्या प्रयत्नांना सुज्ञ पुणेकर थारा देणार नाहीत.
असेही मुरलीधर मोहोळ यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

 

Web Title :- Murlidhar Mohol Criticize Aditya Thackeray | muralidhar mohol criticize aditya thackeray in pune over pune projects

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Sasubai Jorat Marathi Movie | मल्टीस्टारर धमाल कॉमेडी “सासूबाई जोरात’२६ मे पासून संपूर्ण महाराष्ट्रात

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : सहकारनगर पोलिस स्टेशन – वर्षभरापासुन फरारी असलेल्या आरोपीला अटक

Railway Summer Special Trains For Konkan | Pune : या उन्हाळी सुट्टीत करा कोकण वारी; मध्य रेल्वच्या कोकणासाठी विशेष गाड्या