Murlidhar Mohol In MNS Melava | पुणे शहरातील संपूर्ण मनसे महायुती भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारात सक्रिय

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Murlidhar Mohol In MNS Melava | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या नेतृत्त्वावर विश्वास ठेवत जाहीर पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता पुणे शहरातील संपूर्ण मनसे पुणे लोकसभेचे (Pune Lok Sabha) महायुती भाजपचे (Mahayuti BJP Candidate) उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारात सक्रिय झाली आहे. या सर्व सहकाऱ्यांशी मेळाव्याच्या माध्यमातून मुरलीधर मोहोळ यांनी संवाद साधला. (Murlidhar Mohol In MNS Melava )

आपल्या नेत्याप्रती किती विश्वास आणि श्रद्धा असावी? याचा वस्तुपाठ म्हणजे मनसेचा प्रत्येक घटक ! पार्टीच्या स्थापनेपासून तर आजतागायत संघर्ष करत मनसेचे नेते आणि कार्यकर्ते पार्टीसोबत राहिले. हे निश्चितच प्रेरणा देणारे आहे. यावेळी पंतप्रधान मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी राज ठाकरे यांनी केलेल्या आवाहनानुसार सक्रिय राहून कार्यरत राहण्याचे आवाहन मुरलीधर मोहोळ यांनी यावेळी केले. मनसेच्या महायुतीतील समावेशामुळे विजयापासूनचा महाविजयापर्यंतचा टप्पा निश्चितच गाठता येईल, असा ठाम विश्वास मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केला.

मेळाव्यास उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, मनसेचे नेते राजेंद्र (बाबू) वागसकर, सरचिटणीस किशोर शिंदे,
सरचिटणीस बाळाभाऊ शेडगे, सरचिटणीस गणेश सातपुते, सरचिटणीस अजय शिंदे, सरचिटणीस रणजित शिरोळे,
शहराध्यक्ष साईनाथ बाबर, मनसे महिला आघाडी अध्यक्षा वनिता वागस्कर, सचिव-प्रवक्ते योगेश खैरे, विद्यार्थी सेनेचे
प्रमुख संघटक प्रशांत कनोजिया, विद्यार्थी सेनेचे सचिव आशिष साबळे, चित्रपट सेनेचे उपाध्यक्ष रमेश परदेशी,
विद्यार्थी सेना शहराध्यक्ष अमोल शिंदे, विनायक कोतकर, सुधीर धावडे, गणेश भोकरे, अजय कदम, सुनील कदम, विजय मते,
अमोल शिरस, विक्रांत अमराळे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Jayant Patil On PM Narendra Modi | पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शरद पवारांवर टीका का केली?, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी सांगितले ‘हे’ कारण

Ajit Pawar | ‘ती भटकती आत्मा कोण PM मोदींना विचारणार’ शरद पवारांच्या टीकेवर अजित पवारांची प्रतिक्रिया