Murlidhar Mohol | ‘कलाग्राममुळे मिळेल पर्यटनाला चालना’ – मुरलीधर मोहोळ

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन- सिंहगड रस्त्यावरील (Sinhagad Road) पु. ल. देशपांडे उद्यानात (Pul Deshpande Garden) कलाग्राम विकसित करण्यात येत असून, त्या माध्यमातून स्थानिक आणि देश-विदेशातील कलाकारांना आपली कला सादर करण्याची आणि त्यांच्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्री करण्याची संधी मिळणार आहे. या प्रकल्पामुळे पर्यटनाला मोठी चालना मिळेल असा विश्वास महायुतीचे पुणे लोकसभा मतदारसंघातील उमेदवार मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांनी व्यक्त केला. (Pune Lok Sabha)

मोहोळ यांनी आज पु. ल. देशपांडे उद्यानात सकाळी फिरायला आणि व्यायामाला येणाऱ्या नागरिकांची भेट घेऊन प्रचार केला. आमदार माधुरी मिसाळ, अनिता कदम, आनंद रिठे, महेश वाबळे, प्रशांत दिवेकर, जीतेंद्र पोळेकर, विनया बहुलीकर यावेळी सोबत होते.

मोहोळ म्हणाले, ‘दिल्ली हटच्या धर्तीवर हा वैशिष्ट्यपूर्ण प्रकल्प निर्माण करण्यात येत आहे.
या ठिकाणी 200 नागरिक बसू शकतील इतक्या क्षमते आसन व्यवस्था असणारे ॲम्फिथिएटर, अल्पोपहार केंद्र उभारण्यात येत आहे.’

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Adv Ujjwal Nikam | भाजपाचे धक्कातंत्र! ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ ॲड. उज्ज्वल निकम यांना उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी

Murlidhar Mohol | पुणे लोकसभेचे महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या पर्वती विधानसभेतील रॅलीला नागरिकांचा भरभरून प्रतिसाद

Cheating Fraud Case Pimpri Chinchwad | पिंपरी : पोलीस असल्याची बतावणी करुन व्यावसायिकाची फसवणूक, सांगवी पोलिसांकडून तरुणाला अटक

Praniti Shinde On BJP | सत्ता असताना तीन वेळा उमेदवार का बदलला, प्रणिती शिंदे यांचा भाजपला सवाल

Ajit Pawar On Shriniwas Pawar | सख्खा भाऊ विरोधात का गेला, अजित पवारांनीच सांगून टाकलं श्रीनिवास पवार काय म्हणाले होते, तू बारामतीचा उमेदवार बदल, मी प्रचार करतो