Mutual Fund | सेवानिवृत्तीच्या नंतर दरमहिना मिळेल 2 लाख रुपयांची पेन्शन, जाणून घ्या कशी करायची आहे गुंतवणूक?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Mutual Fund | सेवानिवृत्तीचे नियोजन (Retirement Planning) खूप महत्त्वाचे आहे. या नियोजनाची पहिली पायरी म्हणजे निवृत्तीनंतर तुमचे आयुष्य सुरळीत चालण्यासाठी किती पैसे लागतील हे ठरवणे. एखाद्या तरुण व्यक्तीला निवृत्ती (Retirement) बद्दल विचार करणे विचित्र वाटू शकते, परंतु सत्य हे आहे की तुम्ही जितक्या लवकर निवृत्तीचे नियोजन आणि अंमलबजावणी सुरू कराल, तितक्या लवकर तुमचा निवृत्तीनंतरचा फंड (Mutual Fund) जास्त असेल.

 

हे आवश्यक नाही की, एखाद्या व्यक्तीला वयाच्या 60 व्या वर्षीच निवृत्त व्हायचे असेल. आता काही तरुण वयाच्या 45 व्या वर्षी निवृत्तीचा विचार करत आहेत. त्यामुळे निवृत्तीनंतर तुम्हाला आर्थिक अडचणी येऊ नयेत असे वाटत असेल तर आतापासून विचारपूर्वक गुंतवणूक (Investment) करा. पर्सनल फायनान्स एक्सपर्टनुसार, यासाठी म्युच्युअल फंडात गुंतवणूक (Investment In Mutual Funds) करणे फायदेशीर आहे.

 

सतत गुंतवणूक
लाइव्ह मिंटच्या एका रिपोर्टनुसार, जर एखाद्या व्यक्तीचे वय आता 30 वर्षे आहे आणि त्याला वयाच्या 45 व्या वर्षी निवृत्त व्हायचे असेल,
तर त्याला आतापेक्षा जास्त गुंतवणूक करावी लागेल, कारण निवृत्तीनंतर त्याला त्याच्या बचतीतून बरीच वर्षे घालवावी लागतील.
एवढेच नाही तर मुलांच्या शिक्षणाचा खर्चही त्याला करावा लागणार आहे. त्यामुळे या सगळ्यासाठी त्याला आता मोठी गुंतवणूक करावी लागणार आहे.

 

अशा व्यक्तीने म्युच्युअल फंडात (Mutual Fund) दीर्घ मुदतीसाठी मासिक गुंतवणूक (Monthly Investment) सुरू करावी.
ही गुंतवणूक सातत्याने करावी लागेल आणि गुंतवणुकीची रक्कमही कालांतराने वाढवावी लागेल.

असा तयार करा फंड
निवृत्तीनंतर तुम्हाला दरमहा 2 लाख रुपये पेन्शन मिळण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतील.
अ‍ॅसेट मॅनेजरचे मॅनेजिंग पार्टनर सूर्य भाटिया यांनी लाइव्ह मिंटला दिलेल्या माहितीनुसार,
यासाठी गुंतवणुकीत सातत्य ठेवावे लागेल तसेच गुंतवणुकीची रक्कमही कालांतराने वाढवावी लागेल.

 

जर तुम्ही पुढील 33 वर्षांसाठी दरमहा 30000 रुपये वाचवले तर तुमच्याकडे एकूण 1.2 कोटी रुपयांचा निधी असेल.
यामध्ये 9 टक्के वाढ केली तर ती एकूण 7.4 कोटी रुपये इतकी होते. महिन्याचा हिशोब केला तर 6 टक्के विद्ड्रॉल रेटने 3.7 लाख रुपये होतात.

 

जर महागाईचा दर 6 टक्के धरला, तर हे 3.7 लाख रुपये आजच्या काळात 54000 रुपयांच्या बरोबरीचे असतील.
याचा अर्थ आपण आपली बचत वाढवत राहिली पाहिजे.

 

Web Title :- Mutual Fund | what is an ideal plan to earn rupee 2 lakh after retirement

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

ST Workers Strike | एसटी विलिनीकरण ! उच्चस्तरीय समितीच्या अहवालाबाबत राज्य सरकारची मुंबई उच्च न्यायालयात महत्वाची माहिती

 

Nashik Crime | पोलीस हवालदाराची रेल्वेखाली आत्महत्या, नाशिक पोलीस दलात प्रचंड खळबळ

 

Urinary Tract Infections (UTI) | महिलांनी टॉयलेट सीटवर केली ही एक चुक तर ‘या’ आजाराला पडू शकतात बळी, डॉक्टरांनी दिला इशारा