MVA Mahamorcha | महामोर्चा सुरु असताना ठाकरे गटाला धक्का? आणखी एक आमदार, नगरसेवक शिंदे गटात?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महापुरुषांचा अवमान, राज्यातील प्रकल्प बाहेर गेले, शेतकरी, बेरोजगारी, महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न अशा वेगवेगळ्या प्रश्नांवर आज महाविकास आघाडीने मुंबईत महामोर्चा (MVA Mahamorcha) काढला होता. शिवसेना (Shiv Sena), काँग्रेस (Congress), राष्ट्रवादी (NCP) आणि समविचारी पक्षांसह अनेक संघटनांनी या महामोर्चामध्ये (MVA Mahamorcha) सहभाग घेतला होता. एकीकडे महाविकास आघाडीचा मोर्चा सुरु असताना दुसरीकडे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला (Uddhav Balasaheb Thackeray Party) मुंबईत मोठा धक्का बसला आहे.

महाविकास आघडीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या महामोर्चामध्ये (MVA Mahamorcha) तिन्ही पक्षांचे प्रमुख नेते, आमदार (MLA), खासदार (MP), पदाधिकार, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मात्र, ठाकरे गटाचे आमदार प्रकाश फातर्फेकर (Thackeray Group MLA Prakash Phaterpekar) व नगरसेवक अनिल पाटणकर (Corporator Anil Patankar) हे बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे लोकसभा गटनेते खासदार राहुल शेवाळे (MP Rahul Shewale) यांच्यासोबत एका स्थानिक कार्यक्रमात उपस्थित झाल्याचे पहायला मिळाले.

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर ठाकरे गटातील अनेक पदाधिकारी आणि नेते मंडळी शिंदे गटात सहभागी होत आहेत.
यातच आता आणखी एक आमदार शिंदे गटात सहभागी होणार असल्याचे चित्र आज पहायला मिळाले.
आमदार प्रकाश फातर्फेकर आणि नगरसेवक अनिल पाटणकर हे महामोर्चात सहभागी न होता शिंदे गटाचे
खासदार आणि लोकसभा गटनेते राहुल शेवाळे यांच्यासोबत एका स्थानिक कार्य़क्रमात उपस्थित होते.
चेंबूरमध्ये ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’चे उद्घाटन कार्य़क्रमात ठाकरे गटाचे आमदार प्रकाश फातर्फेकर आणि नगरसेवक अनिल पाटणकर उपस्थित झाल्यामुळे राजयकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे.

Web Title :- MVA Mahamorcha | uddhav thackeray mla prakash phaterpekar and corporator anil patankar join eknath shinde group

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Shah Rukh Khan | ‘पठाण’ चित्रपटाच्या वादादरम्यान शाहरुख खानचा जुना व्हिडीओ व्हायरल; बॉयकॉटबाब केलं होतं भाष्य

Pune Crime | अल्पवयीन मुलीचा पाठलाग करुन अ‍ॅसिड फेकण्याची धमकी, 42 वर्षीय आरोपी गजाआड; येरवडा परिसरातील घटना