MY Rikshawala App | ‘ओला’, ‘उबर’शी स्पर्धा करणार ‘बघतोय रिक्षावाला’चे ‘माय रिक्षावाला’ अ‍ॅप; कामगार संघटनेने स्वत:चे स्टार्टअपच्या माध्यमातून देशात प्रथमच तयार केले अ‍ॅप्लिकेशन

पुणे : MY Rikshawala App | ओला (Ola), उबर (Uber), रॅपिडो (Rapido) सारख्या कॅब अ‍ॅग्रेटर कंपन्यांच्या (Cab Aggregator Company) मनमानी कारभाराला व रिक्षाचालकांचे (Rickshaw Driver) उत्पन्न हडप करणार्‍या कंपन्यांशी स्पर्धा करण्यास आता बघतोय रिक्षावाला (Baghtoy Rikshawala) ही संघटना तंत्रज्ञानाच्या जोरावर तयार झाली आहे. त्यांनी ‘माय रिक्षावाला’ (MY Rikshawala App) हे नवीन अ‍ॅप पाडव्याच्या मुहूर्तावर प्रकाशित केले आहे. मालधक्का चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनात पाडव्याच्या मुहूर्तावर शेकडो रिक्षाचालकांच्या उपस्थितीत रिक्षाचालकांच्या मुलींच्या हस्ते लॅपटॉप वर बटन दाबून हे अ‍ॅप प्रर्दशित करण्यात आले.

बघतोय रिक्षावाला या रिक्षाचालकांच्या संघटनेने ओला, उबर, रॅपिडो या कंपन्यांकडून होणार्‍या रिक्षाचालकांच्या आर्थिक लुटीविरुद्ध वारंवार आवाज उडविला आहे. अशा कंपन्यांच्या पिळवणुकीतून मुक्त होण्यासाठी बघतोय रिक्षावाला संघटनेने स्वत:चे ‘माय रिक्षावाला’ (MY Rikshawala App) हे अ‍ॅप्लिकेशन तयार केले आहे. हा स्टार्टअप प्रकल्प केंद्र सरकारच्या (Central Government) स्टार्टअप इंडिया (Startup India) योजनेअंतर्गत डी पी आय आय टी अंतर्गत नोंदणी झालेला आहे. एखाद्या कामगार संघटनेने अशा प्रकाराचे अ‍ॅप्लिकेशन तयार करण्याचा हा देशातील पहिलाच प्रयत्न आहे.

याबाबत संघटनेचे अध्यक्ष डॉ. केशव क्षीरसागर (Dr. Keshav Kshirsagar) यांनी सांगितले की, या अ‍ॅप्लिकेशनवरुन ग्राहकांना रिक्षा बुक करता येणार असून प्रवाशांसाठी हे अ‍ॅप्लिकेशन पूर्णपणे मोफत असणार आहे. कुठल्याही प्रकारचे कमिशन हे अ‍ॅप्लिकेशन प्रवाशांकडून घेणार नाही. तसेच ओला, उबेरसारख्या कंपन्या, गर्दीच्या वेळी किंवा पावसासारखे परिस्थितीमध्ये सर्च प्राईसिंगच्या नावाखाली प्रवाशांकडून दुप्पट तिप्पट भाडे आकारतात, ते सुद्धा माय रिक्षावाला अ‍ॅप्लिकेशनमध्ये होणार नाही. तसेच रिक्षाचालकांकडून सुद्धा हे अ‍ॅप्लिकेशन कोणत्याही प्रकारचे कमिशन न घेता, काही महिन्यांनंतर माफक दरात प्लॅटफॉर्म फी घेऊन ही सुविधा रिक्षाचालकांना उपलब्ध करुन देणार आहे.

पहिल्या दिवशीच पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील ४ हजार पेक्षा अधिक रिक्षाचालकांनी हे अ‍ॅल्पिकेशन डाऊनलोड
करुन मोठ्या प्रमाणात पाठिंबा दर्शविला.

उद्घाटन प्रसंगी उपस्थित रिक्षाचालकांनी मेणबत्ती हातात घेऊन शपथ घेतली की, ते वृद्ध, अपंग व महिला प्रवाशांना
सर्वोतो परी मदत करतील. त्यांच्याशी सौजन्याने वागतील, कुठलेही भाडे नाकारणार नाही.
रस्ते अपघातामधील जखमींना मदत करतील. आरटीओचे सर्व नियम पाळतील.

हे अ‍ॅप्लिकेशन रिक्षा सेवेची व्याख्या बदलून इतिहास प्रस्थापित करेल व सर्व असंघटित क्षेत्रातील कामगारांना अशा
प्रकारे अ‍ॅप्लिकेशन च्या माध्यमातून पिळवणुक करणार्‍या कंपन्यांशी दोन हात करण्यासाठी दिशा देईल,
असे डॉ. केशव क्षीरसागर यांनी सांगितले.

पुढील २ महिने ट्रायल रन घेऊन येत्या काही दिवसात हे अ‍ॅप्लिकेशनचे बाजारात लॉच करण्यात येणार आहे.
गुगल प्ले स्टोअरवर जाऊन ‘माय रिक्षावाला’ हे अ‍ॅप डाऊनलोड करता येईल.

Web Title :- MY Rikshawala App | Bagtoy Rickshawala’s ‘My Rickshawala’ app to compete with ‘Ola’, ‘Uber’; The labor union created its own startup application for the first time in the country

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime | पोलिसांचा टिपर असल्याच्या संशयावरुन तरुणावर टोळक्याने तलवारीने वार करुन केला जीवे मारण्याचा प्रयत्न

Mumbai Crime | धक्कादायक! ‘या’ प्रसिद्ध दिग्दर्शकाने पत्नीला कारने चिरडलं; CCTV फुटेज आले समोर (व्हिडिओ)