TV च्या ‘नागिन’ चा समुद्रात ‘फ्लोटींग’ ब्रेकफास्ट, पिंक स्विमसूटमध्ये दिसली एकदम ‘कडक’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – टीव्हीवरील सर्वात प्रसिद्ध मालिका नागिनमधील अभिनेत्री अदा खान सध्या मालदीवमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेताना दिसत आहे. अदा खाननं व्हॅकेशनमधील अनेक फोटो शेअर केले आहेत ज्यात ती फुल एन्जॉय करताना दिसत आहे. सध्या तिचे काही फोटो समोर आले आहेत जे व्हायरल होताना दिसत आहेत.

समोर आलेल्या फोटोंमध्ये अदा समुद्रात फ्लोटींग ब्रेकफास्ट घेताना दिसत आहे. अदाच्या लुकबद्दल बोलायचं झालं तर अदा पिंक अँड प्रिंटेड स्विमसूटमध्ये दिसत आहे. तिनं हाय बन सोबतच सनग्लासेस लावले आहेत. अदाच्या या बोल्ड लुकनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

व्हॅकेशन एन्जॉय करणारी अदा आपल्या फ्रेंड्ससोबत फ्लोटींग ब्रेकफास्ट घेताना दिसली. एक अभिनेत्री म्हणून ओळख तयार करण्यासाठी अदानं इंडस्ट्रीत खूप स्ट्रगल केला आहे.

अदाच्या लव लाईफबद्दल बोलायचं झालं तर टीव्ही स्टार अंकित गेराला तिनं 4 वर्ष डेट केलं. यानंतर दोघांनी एकमेकांपासून अंतर ठेवायला सुरुवात केली.

https://www.instagram.com/p/B8LIPU3g4co/

अदाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तिनं पालमपूर एक्सप्रेस, बहनें, अमृत मंथन, ये है आशिकी, विश या अमृत अशा अनेक मालिकेत काम केलं आहे. विश या अमृत मालिकेतील सिताराच्या भूमिकेनं तिला खूप लोकप्रियता मिळाली. लवकरच ती कलर्सच्या खतरों के खिलाडी या शोमध्ये खतरनाक स्टंट करताना दिसणार आहे.

https://www.instagram.com/p/B8QzZbYlR1f/