Nagpur ACB Trap | 20 हजार रुपये लाच घेताना उपजिल्हाधिकाऱ्यासह एक जण अँटी करप्शनच्या जाळ्यात, घटनास्थळी वेगवेगळ्या पाकीटात सापडली लाखोंची रोकड

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – रेशन दुकानाकरिता शासनातर्फे पंतप्रधान गरीब कल्याण योजने (Pradhan Mantri Garib Kalyan Yojana) अंतर्गत कायदेशीर कमिशन मिळते. हे कमिशन मिळवून दिल्याच्या मोबदल्यात 50 हजार रुपये लाचेची मागणी करुन 20 हजारांचा पहिला हप्ता स्वीकारताना (Accepting Bribe) वर्धा जिल्ह्याचे उपजिल्हाधिकारी (Deputy Collector) तथा जिल्हा पुरवठा अधिकारी (District Supply Officer) वर एका खासगी व्यक्तीला नागपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Nagpur ACB Trap) सापळा रचून रंगेहाथ पकडले. नागपूर एसीबीच्या पथकाने (Nagpur ACB Trap) ही कारवाई बुधवारी (दि.16) वर्धा येथील शासकीय विश्रामगृह येथे केली. यानंतर एसबीच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळी वेगवेगळ्या पाकिटात तब्बल 5 लाख 60 हजार 360 रुपयांची रोकड मिळाली. या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे.

 

उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा पुरवठा अधिकारी विजय कृष्णराव सहारे Vijay Krishnarao sahare (वय 50 ह/मु रेस्ट हाऊस, जि वर्धा मूळ रा. आंबेडकर वार्ड, रामटेक, जि नागपुर), खाजगी व्यक्ती ऋषिकेष रमेशराव ढोडरे Hrishikesh Rameshrao Dhodere (वय 43रा. केशवसिटी, जि. वर्धा) असे लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आलेल्या लाचखोरांची नावे आहेत. याबाबत देवळी तालुक्यातील 46 वर्षाच्या एका राशन दुकानदाराने नागपूर एसीबीकडे (Nagpur ACB Trap) तक्रार केली आहे.

 

तक्रारदार यांची दोन राशनची दुकाने आहेत. तक्रारदार यांना राशन दुकानाकरिता शासनातर्फे पंतप्रधान गरीब कल्याण योजने अंतर्गत कायदेशीर कमिशन मिळते. ते कमिशन विजय सहारे यांनी काढल्याने त्याचे 25 हजार रुपये. तसेच तक्रारदार यांच्या दुसऱ्या राशन दुकानाचे 7 महीन्यांचा हफ्ता 25 हजार रूपये असे एकुण 50 हजार रुपये लाचेची मागणी विजय सहारे यांनी केली. तडजोडीअंती 40 हजार रुपये देण्याचे ठरले होते. तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी नागपूर एसीबीकडे तक्रार केली.

प्राप्त तक्रारीची बुधवारी पडताळणी केली असता विजय सहारे यांनी 50 हजार रुपये लाचेची मागणी करुन
तडजोडी अंती 40 हजार रुपये स्विकारण्याची तयारी दर्शविली.
पथकाने शासकीय विश्रामगृह येथे सापळा रचला.
खासगी व्यक्ती ऋषिकेश ढोडरे यांच्या मार्फत 20 हजार रुपयांचा पहिला हप्ता स्विकारताना दोघांना रंगेहाथ पकडण्यात आले.
पथकाने विश्रामगृहाची तपासणी केली असता वेगवेगळ्या पाकीटात 5 लाख 60 हजार 360 रुपये मिळाले.
आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून वर्धा शहर पोलीस ठाण्यात (Wardha City Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपूर परिक्षेत्र, नागपूर, पोलीस अधीक्षक राहुल माकणीकर (SP Rahul Maknikar),
अपर पोलीस अधीक्षक मधुकर गिते (Addl SP Madhukar Gite) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधीक्षक अनामिका मिर्झापुरे (DySP Anamika Mirzapure),
पोलीस निरीक्षक प्रवीण लाकडे (Police Inspector Pravin Lakde) पोलीस अंमलदार सारंग बालपांडे,
गीता चौधरी, करुणा सहारे, अस्मिता मेश्राम, आशू श्रीरामे, चालक विकास गंडेवार यांच्या पथकाने केली.

 

Web Title :- Nagpur ACB Trap | One person in anti-corruption net along with sub-district officer while taking bribe of 20 thousand rupees

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Rudraksh Mahotsav in Sehore | धक्कादायक! रुद्राक्ष महोत्सवामध्ये झालेल्या धक्काबुक्कीत बुलडाण्यातील 3 महिला बेपत्ता

Pune Crime News | पत्नीचा गळा दाबून खून करुन पतीने विष प्राशन करुन केला आत्महत्येचा प्रयत्न

Pune Crime News | अभ्यास करताना मोबाईल पाहतो, म्हणून रागविल्याने १२ वीतील मुलाने आईचा गळा दाबून केला खून, पुण्यातील घटना