Nagpur Crime News | लग्न करायला नकार देत तरुणीने विष पिऊन कॉलेज मध्येच केली आत्महत्या; नागपूरमधील घटना

पोलीसनामा ऑनलाइन : Nagpur Crime News | आजच्या तरुण पिढींना शिक्षण करियर करून यशस्वी होणे यात जास्त रस आहे. आजच्या तरुण पिढीचे लग्नानंतर आपण एखाद्या बंधनात अडकतो आणि आपल्या यशात अडथळा निर्माण येऊ शकतो असे विचार असल्याने ते कोणत्याही बंधनात अडकून राहू इच्छित नाहीत. त्यामुळे आजची पिढी लग्नासाठी घाई करताना दिसत नाही. अशीच एक घटना नागपूर येथे पाहायला मिळाली. लग्न करण्यासाठी मुलीने नकार दिला मात्र आई-वडिलांनी मुलाकडच्या मंडळीला घरी बोलावल्यानंतर मुलीने कॉलेजमध्ये जाऊन विष प्राशन करत स्वतःचे आयुष्य संपवले आहे. ही संपूर्ण घटना नागपुरातील धंतोली येथील आनंद टॉकिजजवळ असलेल्या महिला औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत घडली आहे. ही 23 वर्षीय तरुणी मानेवाडा येथील रहिवासी आहे. (Nagpur Crime News)

काय आहे संपूर्ण प्रकरण?
ही 23 वर्षीय तरुणी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिक्षण घेत होती. सोमवारी म्हणजे 6 मार्च रोजी अकरा वाजता ती नेहमीप्रमाणे संस्थेत गेली. मात्र तिच्या आई-वडिलांनी तिचे लग्न करायचे ठरवल्याने त्याच दिवशी मुलाकडील मंडळींना घरी बोलावले आणि तिला फोन करून तातडीने घरी येण्यास सांगितले. मुलीला मात्र आत्ताच लग्न करायचे नव्हते. तिला शिक्षण पूर्ण करून नोकरी देखील करायची इच्छा होती त्यामुळे तिने घरी येण्यास नकार दिला. आज होळी आहे तरीही तुम्ही त्यांना बोलावलं असे ती आईला म्हणाली इतकेच नाही तर तिचे एका तरुणावर प्रेम देखील होते. त्याच्याशी तिला लग्न करायचे होते. त्यामुळे ती लग्नाला नकार देत होती. (Nagpur Crime News)

अखेर 6 मार्चला तिने वर्गातच कीटकनाशक प्राशन केले. ही बाब इतर विद्यार्थ्यांना कळताच तिला तातडीने
लता मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले.
उपचारादरम्यान 11 मार्चला सकाळी साडेअकरा वाजता तिचा मृत्यू झाला.
याबाबत अधिक माहिती धंतोली पोलीस ठाण्याचे हवलदार क्रिष्णा, उपनिरीक्षक शेख यांनी देण्यास नकार दिला आहे.
पोलिसांनी या प्रकरणाची आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे.
तर तरुणीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

Advt.

Web Title :- Nagpur Crime News | 23 year old girl finish life in college when parents force her for arrange marriage in nagpur

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

karishma Kapoor | ‘या’ कारणामुळे मी इतकी वर्ष मोठ्या पडद्यापासून दूर होते; करिश्मा कपूरने केला मोठा खुलासा

Kala Jeevan Garav Puraskar | संस्कार आणि संस्कृतीचे प्रतीक असलेला हा पुरस्कार जबाबदारी वाढविणारा – दिग्दर्शक व अभिनेते प्रविण तरडे