Pune Pimpri Crime News | रिक्षाचालकाने रिक्षासह पळून जाताना पोलीस कर्मचाऱ्याला फरफटत नेले

तळेगाव ढमढेरे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Crime News | शिक्रापूर पोलीस ठाण्यातील (Shikrapur Police Station) पोलीस अधिकारी व कर्मचारी पेट्रोलिंग करत असताना एक संशयित रिक्षाची चोरी करत होता. यावेळी रिक्षाचालकाने रिक्षासह पळून जाताना पोलीस हवालदाराला फरपटत नेले. त्यामुळे पोलीस हवालदार जखमी झाले आहेत. शंकर तानाजी साळुंके असे जखमी झालेल्या पोलीस हवालदाराचे नाव आहे. (Pune Pimpri Crime News)

शिक्रापूरचे पोलीस उपनिरीक्षक रज्जाक शेख (PSI Razzak Shaikh) व पोलीस हवालदार शंकर साळुंके (Police Constable Shankar Salunke) हे पेट्रोलिंग करीत होते. रात्री अडीचच्या सुमारास शिक्रापुर-तळेगाव ढमढेरे रस्त्यावरील ओढ्याच्या कडेला उभी असलेली रिक्षा संशयास्पद आढळून आली. त्यावेळी साळुंके यांनी रिक्षाजवळ जाऊन चौकशी करण्याचा प्रयत्न केला असता रिक्षाचालक रिक्षा घेऊन पळून जाऊ लागला. (Pune Pimpri Crime News)

त्यावेळी शंकर साळुंके यांनी रिक्षाचालकाला पकडण्याचा प्रयत्न केला असता त्याने साळुंके यांना पुढे फरपटत नेले. याबाबत शंकर तानाजी साळुंके (वय-44) यांनी शिक्रापुर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी उमेश सागर अडागळे (वय-32 रा. टाकळी भीमा ता. शिरुर) या रिक्षाचालकावर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

ऑनलाइन नोकरीचे आमिष दाखवून महिलेची 13 लाखांची फसवणूक, चिंचवडमधील प्रकार

ग्राहकांनी ऑनलाईन मागवलेले 23 मोबाईल कुरिअर कंपनीच्या कर्मचाऱ्याने पळवले, पिंपरी चिंचवडमधील प्रकार

एकाच फ्लॅटची दोन जणांना विक्री, बिल्डरसह तिघांवर गुन्हा दाखल; देहुगाव येथील प्रकार

ऑनलाइन टास्क देऊन तरुणाला 18 लाखांचा गंडा, पिंपळे गुरव मधील प्रकार

Pune Crime News | पूर्ववैमनस्यातून तरुणावर चाकूने वार, घोरपडी गावातील प्रकार

Pune Crime News | इन्स्टाग्रामवर व्हिडिओ का टाकला?, तरुणाला टोळक्याकडून बेदम मारहाण; उरुळी देवाची येथील घटना

सार्वजनिक रोडवर अल्पवयीन मुलीसोबत गैरवर्तन, हडपसरमधील प्रकार; दोघांना अटक