आता लहान मुलांनाही मिळणार कोरोना लस, नागपुरात 50 मुलांची स्क्रिनिंग, उद्या होणार क्लिनिकल ट्रायल

नागपूर nagpur : पोलीसनामा ऑनलाइन – देशात थैमान घातलेली कोरोनाची दुसरी लाट आता ओसरू लागली आहे. मात्र तिस-या लाटेचा धोका कायम आहे. त्यामुळे लहान मुलांचा कोरोनापासून बचाव करण्यासाठी कोरोना प्रतिबंधक लस फार महत्वाची ठरणार आहे. याचाच एक भाग म्हणून आता देशात 4 ठिकाणी भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन या लसीची क्लिनिकल ट्रायल होत आहे. यात महाराष्ट्रातील नागपूरचा nagpur समावेश असून त्यानुसार शनिवारी (दि. 5) शहरात लहान मुलांवर लसीच्या प्राथमिक चाचणीला सुरुवात झाली आहे.

Pune Unlock : पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडून Unlock ची नियमावली जाहीर; जाणून घ्या सोमवारपासून काय सुरू अन् काय बंद

नागपूरातील मेडिट्रेना हॉस्पिटलमध्ये आज 12 ते 18 वयोगटातील मुलांच्या रक्ताचे नमुने घेतले.
हेल्दी सॅम्पल टेस्टिंगसाठी आज 50 मुलांची स्क्रिनिंग घेतली.
याचे रिपोर्ट आल्यावर रविवारी (दि. 6) वॅक्सिनच्या ट्रालयला सुरुवात होणार आहे.
एकूण 3 टप्प्यांत हे ट्रायल होणार असून पहिल्या टप्प्यात 12 ते 18 वयोगटातील मुलांवर,
दुसऱ्या टप्प्यात 7 ते 11 वयाच्या मुलांवर आणि तिस-या टप्प्यात 2 ते 6 वयोगटातील मुलांवर चाचणी होईल. या क्लिनिकल ट्रायलमध्ये मुलांची रक्ताची तपासणी होणार आहे.
नागपुरात nagpur क्लिनिकल ट्रायल बालरोगतज्ञ डॉ. वसंत खळतकर यांच्या देखरेखीखाली होणार आहे. यात सुरुवातीला स्टडी सॅम्पल घेण्यात येईल.
ज्या मुलांवर परिणाम चांगले असतील त्यांना 28 दिवसांनी दुसरा दिला जाईल.

देशातील 4 ठिकाणी 208 दिवस हे ट्रायल चालणार आहे. एकूण 525 मुलांचे क्लिनिकल ट्रायल होत आहे. 2 ते 6 वर्षे वयोगटातील 175 मुलांना, 6 ते 12 वयोगटातील 175 आणि 12 ते 18 वर्ष वयोगटातील 175 मुलांवर ही ट्रायल होईल. लहान मुलांना लस दिल्यास हर्ड इम्युनिटी तयार होण्यास मदत होते. तसेच लसीकरणानंतर कोरोनाचा धोका कमी होतो. कोरोना पसरण्याची शक्यता कमी असते. तसेच संपर्कात येणाऱ्यांचा जीव वाचू शकतो.

READ ALSO THIS :

 

तुमचा रंग सावळा आहे का ? याचे आरोग्यदायी फायदे जाणून व्हाल थक्क !

 

मराठा आरक्षण रद्द होण्यामागे ‘हे’ दोन प्रमुख कायदेशीर मुद्दे; जाणून घ्या

 

दोन सख्ख्या बहिणींची गळफास घेऊन आत्महत्या, प्रचंड खळबळ

 

25 वर्षांच्या हलीमाने एकाचवेळी दिला होता 9 मुलांना जन्म; एक महिन्यानंतर ‘ही’ आहे स्थिती