‘समृद्धी महामार्गाला राजमाता जिजाऊंचे नाव द्यावे’ :  संभाजी राजे

बुलडाणा : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबई आणि नागपूरला जोडणारा 800 किमी लांबीचा समृद्धी महामार्ग हा जिजाऊंच्या नावाने ओळखला गेला पाहिजे असं वक्तव्य खासदार संभाजीराजे भोसले यांनी केली आहे. इतकेच नाही तर मुंबई आणि नागपूरला जोडणाऱ्या समृद्धी महामार्गाला राजमाता जिजाऊंचे नाव देण्यात यावे, अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. आज जिजाऊंच्या जन्मदिनानिमित्त सिंदखेड राजा येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी उपस्थितांना संबोधित केले.
राजमाता जिजाऊ यांच्या 421 व्या जन्मोत्सवानिमित्त सिंदखेडराजा येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रमाता जिजाऊ माँ साहेब यांच्या जन्मस्थळ असलेल्या राजे लखुजीराव जाधव यांच्या राजवाड्यावर १२ जानेवारी रोजी सूर्योदयापासूनच महाराष्ट्रसह देशाच्या कानाकोपऱ्यातून माँ जिजाऊचरणी लीन होऊन माँ साहेब जिजांऊचे आर्शीवाद घेण्यासाठी जनसागर उसळला होता.
दरम्यान, राजमाता जिजाऊंचा जन्मदिन आज सिंदखेड राजा येथे उत्साहात साजरा झाला. यावेळी मराठा सेवा संघ, जिजाऊंचे वंशज शिवाजी राजे, जिजाऊ ब्रिगेड, संभाजी ब्रिगेड, नगर परिषद, जिल्हा परिषद, पंचायत समिती व महाराष्ट्र शासनाच्यावतीने १२ जानेवारी रोजी जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त जिजाऊ माँसाहेबांची महापूजा करुन जिजाऊंना अभिवादन करण्यात आले.
यावेळी अभिनेते आणि शिवसेना नेते डॉ. अमोल कोल्हे हेही उपस्थित होते. त्यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले की, “जिजाऊंच्या संस्कारामुळेच छत्रपती शिवाजी महाराज घडले. त्यामुळे प्रत्येक घरात जिजाऊ जन्माला यायला हव्यात. कारण प्रत्येक घरात जिजाऊ जन्माला आल्या तर शिवबा जन्माला येईल.” इतकेच नाही तर, प्रत्येकानं आपल्या मनातला शिवविचार जागा ठेवण्याची गरज असल्याचं त्यांनी म्हटलं. याशिवाय आपल्या घरातील जिजाऊंचा सन्मान करण्याचाही सल्लाही त्यांनी  दिला.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
WhatsApp WhatsApp us