Nana Patole | जरांगेंच्या उपोषणस्थळी दोन्ही उपमुख्यमंत्री का गेले नाहीत?, आरक्षणाचा अध्यादेश फसवा, नाना पटोलेंची टीका

धुळे : पोलीसनामा ऑनलाईन – Nana Patole | राज्य सरकारने मराठा समाजाला (Maratha Reservation) आरक्षण कसे दिले हे स्पष्ट केलेले नाही. आरक्षण देताना नेमके ओबीसींना फसविले की मराठ्यांना?, तसेच जरांगे पाटील यांच्या उपोषणस्थळी दोन्ही उपमुख्यमंत्री का गेले नाहीत?, असे प्रश्न उपस्थित करत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपावर टीकास्त्र सोडले आहे. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी काढलेले जीआर ही फसवाफसवी असल्याचे पटोले यांनी म्हटले आहे. (Nana Patole )

धुळे येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीची उत्तर महाराष्ट्र विभागीय जिल्हानिहाय आढावा बैठक आज पार पडली. या बैठकीपूर्वी पटोले पत्रकारांशी बोलत होते.

नाना पटोले म्हणाले, जणगणनेच्या आधारावर आरक्षण द्यायला हवे. पण सरकारने केवळ संभ्रम निर्माण केला आहे. ओबीसी आणि मराठा समाजापैकी कोणाला कसे आरक्षण दिले, हे स्पष्ट करायला हवे. आरक्षण देताना फसवाफसवीचे राजकारण केले आहे. हे फसवे सरकार आहे. आरक्षणाचा अध्यादेश फडणवीस यांनीही काढला होता, तेच आताही केले आहे.

भाजपावर टीका करताना नाना पटोले म्हणाले, भ्रष्टाचारी लोकांना पक्षात घेणे ही भाजपाची नीती आहे.
रामापेक्षा मोठे झाल्याचा त्यांचा अविर्भाव आहे. मूळ मुद्दे सोडून इती मुद्यांवर लक्ष केंद्रित केले जात आहे.
हे रावणापेक्षाही वाईट राज्य आहे. उत्तर प्रदेशची बुलडोझर पध्दत मुंबईतील मीरा रोडवर आणली. ही हुकूमशाहीची मानसिकता आहे. रामाच्या नावावर देशविभाजन काँग्रेस खपवून घेणार नाही. विरोधकांवर खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत. भाजपकडे माणसे नसल्याने भ्रष्टाचारी लोक जमवले आहेत. मात्र, तिकडे गेलेल्यांसाठी आता आमची दारे बंद झाली आहेत.

यावेळी काँग्रेस महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी भाजपावर टीका करताना म्हटले की, भाजप देशाला तोडण्याचे
काम करत आहे. राममंदिर आणि हिंदुत्वाशिवाय पंतप्रधान दुसरे काही बोलत नाहीत. ते पत्रकार परिषद घेत नाहीत.
आता देशाला धर्मनिरपेक्ष काँग्रेसची आवश्यकता आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Alandi Crime | खळबळजनक! आळंदीत वारकरी शिक्षण देणाऱ्या संस्था चालकाकडून तीन अल्पवयीन विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचार

Maratha Reservation | मराठा आरक्षण लढ्याला यश ! सर्व मागण्या मान्य, सरकारने अखेर अध्यादेश काढला, विजयी सभा लवकरच

Maratha Reservation | मराठा आरक्षणातील ‘सगेसोयरे’चा अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमातींनाही फायदा; काय नेमके म्हटले आहे अध्यादेशात, कसा होणार इतरांनाही फायदा, जाणून घ्या

Pune Viman Nagar Crime | अभिनेत्रीवर बलात्कार केल्याप्रकरणी सोलापूरच्या विराज रविकांत पाटील याच्यावर पुण्यात गुन्हा; पिस्तूल डोक्याला लावून धमकावले

पुणे : तरुणीला मारहाण करुन अंगावरील कपडे फाडले, सात जणांवर FIR

पुणे : अल्पवयीन मुलीचा पाठलाग करुन विनयभंग, अल्पवयीन मुलासह तिघांवर गुन्हा