Nana Patole on Aditya Thackeray | नाना पटोलेंचा आदित्य ठाकरेंना टोला; म्हणाले – ‘आमच्या गुडलकमुळेच तुम्ही सत्तेत आहात’

भंडारा : पोलीसनामा ऑनलाइन – Nana Patole on Aditya Thackeray | राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील (Mahavikas Aghadi Government) होणाऱ्या कुजबूजी कमी होताना दिसत नाहीत. अशातच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी थेट राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांना टोला लगावला आहे. ‘आमचे गुडलक सोबत आहे म्हणून तुम्ही सत्तेत आहात’ असा निशाणा पटोले यांनी आदित्य ठाकरेंना लगावला. तसेच, ‘आमदार निधी वाटपावरून चुकीच्या मेसेज जात असल्याने हे प्रश्न भविष्यात घडू नये म्हणून मुख्यमंत्र्यांनी आपली भूमिका निश्चित करावी,’ असा सल्ला देखील नाना पटोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना दिला. (Nana Patole on Aditya Thackeray)

 

”महापालिकेत काँग्रेसची सत्ता असताना मुंबई कधी तुंबली नाही,” असं विधान नाना पटोले यांनी नागपुरात केले होते. मात्र, ‘त्याला आता 25 वर्षे उलटून गेली आहे. आता ते सोबतच आहेत त्यामुळे बघुया त्याचं गुडलक कामाला येतंय का?” असा खोचक टोला आदित्य ठाकरे यांनी नाना पटोलेंना लगावला होता. यानंतर नाना पटोलेंनी प्रत्युत्तर दिलं आहे.

”आदित्य ठाकरे यांनी काँग्रेसच्या बाजूने मत मांडले आहे. पण आमचा गुडलक सोबत आहे म्हणून तुम्ही सत्तेत आहात,”
असा टोला नाना पटोले यांनी लगावला आहे.
दरम्यान, आमदार निधी वाटपात भेदभाव होणे हा गंभीर प्रश्न असून ठरल्याप्रमाणे निधी वाटप होणे गरजेचे आहे.
काँग्रेसने ही निधी वाटपात भेदभाव होण्याच्या तक्रारी अनेक वेळी केली आहे.
या गोष्टीमुळे समाजात चुकीचा मेसेज जात असल्याने हे प्रश्न भविष्यात घडू नये म्हणून मुख्यमंत्र्यांनी आपली भूमिका निश्चित करावी,”
अशी मागणी पटोले यांनी केली.

 

Web Title :- Nana Patole on Aditya Thackeray | you are in power because of our good luck congress leader nana patoles on aditya thackeray

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

MNS Chief Raj Thackeray – Ajit Pawar | राज ठाकरेंनी अजित पवारांचं ‘ते’ आव्हान स्विकारलं? पुण्यात ‘या’ दिवशी होणार ‘राज’गर्जना

 

Ajit Pawar On Journalist | सवाल करताच अजित पवार वैतागले; म्हणाले – ‘हम बहुत गंभीर है, अभी स्टॅम्प पेपरपे लिखके दू’