नांदेड : तलावात उडी मारून प्रेमी युगुलाची आत्महत्या

नांदेड : पोलीसनामा ऑनलाईन

आपल्या प्रेमाला समाजातून विरोध होणार, यातून आलेल्या नैराश्यातून नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यात एका प्रेमी युगुलाने तलावात उडी मारून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. दीक्षा जजबा टोंपे (१८) व तानाजी शिवाजी सोनकांबळे (वय २९) अशी आत्महत्या केलेल्या दोघांची नावे आहेत. दोघांच्याही घरच्यांनी कोणताही आरोप केला नसून पोलिसांच्या कारवाईनंतर मृतदेह ताब्यात घेतले.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’74869be4-c9f1-11e8-95cd-51f6e0186519′]

देगलूरकर तालुक्यातील मुजळगा गावात राहणारी दीक्षा टोंपे या तरुणीचे तानाजी सोनकांबळे या तरूणाशी प्रेमसंबंध होते. तानाजी हा दीक्षाच्या वडिलांच्या भाच्याचा मुलगा आहे. दीक्षा ही गेल्या दोन वर्षांपासून घरीच होती. चार दिवसापूर्वी दीक्षा आणि तानाजी हे दोघे घरातून न सांगता निघून गेले. नातेवाईकांनी सर्वत्र दोघांचा शोध घेतला असता दोघांचा ठावठिकाणा न लागल्याने शेवटी या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली.

हडपसर पोलिसांच्या हातावर तुरी देऊन बेड्यासह पळालेला आरोपी गजाआड

त्यानंतर शनिवारी संध्याकाळी दोघांचे मृतदेह चैनपूर येथील तलावात आढळले. पोलिसांनी याची माहिती दोघांच्या कुटुंबीयांना दिली. याप्रकरणी दीक्षाचे वडील जजबा टोपे यांनी प्रेम संबंधातून दोघांनी आत्महत्या केल्याचा जबाब पोलिसांना दिला आहे. याप्रकरणी कोणावरही संशय नसल्याचे त्यांनी जबाबात म्हटले आहे.

[amazon_link asins=’B00NTCH52W’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’8d3b11d0-c9f1-11e8-9dc0-e9950e52bd7f’]

दिक्षा आणि तानाजी यांचे मागील एक-दीड वर्षापासून प्रेमसंबंध होते. दोघेही एकमेकांचे नातलग असून ते एकमेकांच्या शेजारी राहत होते. मुलीच्या घरची परिस्थिती जेमतेम तर मुलाच्या घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. गतवर्षी हेच प्रेमीयुगुल गावातून पळून गेले होते. यानंतर नातेवाईकांनी बैठक घेतली होती. मात्र मुलीच्या आई- वडिलांनी मुलाची हलाखीची परिस्थिती असल्याने या प्रेमविवाहास विरोध केला होता. आपले आई वडील कधीतरी आपल्या विवाहास संमती देतील या आशेत हे प्रेमीयुगल होते. मात्र, वर्ष उलटले तरी मुलीच्या घरच्यांचा विरोध कायम होता. त्यामुळे ३ ऑक्टोंबरला प्रेमीयुगल गावातून गायब झाले होते. शनिवारी सायंकाळी पाच वाजता एक गुराखी आपली जनावरे पाणी पाजण्यासाठी  गावालगतच्या भेंड तलावात गेला असता, त्यास दोन मृतदेह पाण्यात  तरंगत असल्याचे दिसले. घरच्यांचा विवाहास विरोध कायम असल्याने या प्रेमी युगुलाने आत्महत्या केली.