Nanded Crime News | पार्टी करताना वाद झाल्याने आरोपीकडून मित्रावर प्राणघातक हल्ला; नांदेडमधील घटना

नांदेड : पोलीसनामा ऑनलाईन – Nanded Crime News | नांदेडमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये मित्रानेच एका छोट्याशा भांडणातून आपल्या जवळच्या मित्रावर प्राणघातक हल्ला केला आहे. नांदेड शहराच्या विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत नुरी चौक माळटेकडी परिसरात हि घटना घडली आहे. खाण्यापिण्याच्या वादावरून आरोपीने आपल्याकडे असणाऱ्या गावठी कट्ट्यातून मित्रावर फायरिंग केली आहे. यामध्ये जखमी झालेल्या मित्रावर नांदेडच्या विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे. हि घटना काल सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली आहे. (Nanded Crime News)

काय आहे संपूर्ण प्रकरण?
शेख इरफान शेख गुड्डू (वय 25, रा. मगदूमनगर, न‌ई आबादी नांदेड) असे या हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. नांदेड शहराच्या माळटेकडी परिसरातील नुरी चौक भागात शेख इरफान शेख गुड्डू व त्याचा मित्र हे दोघे पार्टी करत बसले होते. थोड्यावेळात खाण्यापिण्याच्या कारणावरून दोघांमध्ये वाद झाला. यावेळी आरोपी मित्राने शेख इरफान शेख गुड्डू याच्यावर आपल्याजवळ असलेल्या गावठी कट्ट्यातून फायरिंग (Firing) केली. यामध्ये शेख इरफान याच्या पोटाला गोळी लागली आणि तो जखमी झाला. (Nanded Crime News)

या घटनेची माहिती मिळताच विमानतळाचे पोलीस अधिकारी यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी
दाखल झाले. जखमी शेख इरफान याला विष्णुपुरीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.
त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येत असून त्याची प्रकृती गंभीर आहे.
या प्रकरणी आरोपीविरोधात विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विमानतळ पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
शहराच्या इतवारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन फायरिंगच्या घटना ताज्या असतानाच पुन्हा नांदेड शहरामध्ये
विमान ठाण्याच्या हद्दीत फायरिंगची घटना घडल्याने नांदेड जिल्हा हादरला आहे.
या घटनेमुळे सामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Web Title :- Nanded Crime News | a friend firing a friend at an ongoing party in nanded

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Krushi Utpanna Bazar Samiti | कृषि उत्पन्न बाजार समित्यांची सुधारित प्रारुप मतदार यादी 27 फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध होणार; राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण आयुक्त डॉ. जगदीश पाटील

Pune Crime News | 10 टक्के व्याजाने पैसे परत केल्यानंतरही धमकाविणार्‍या गुंडावर कारवाई

Aurangabad Crime | बापाच्या दारू पिण्याच्या सवयीला वैतागून पोटच्या मुलांनीच केली बापाची हत्या