चारित्र्याच्या संशयावरून पतीने केली पत्नी आणि दीड वर्षाच्या मुलाची हत्या

नांदगाव: पोलिसनामा ऑनलाईन

नांदगाव तालुक्यातील कासारी येथे राहणाऱ्या सुवर्णा ज्ञानेश्‍वर काळे आणि त्यांचा दिड वर्षांचा मुलगा स्वरूप यांची हत्या सुवर्णनाचा पती ज्ञानेश्वर काशिनाथ काळे याने केली . २१ वर्षीय सुवर्णाचा चारित्र्याचा संशय घेत गळ्याला फास लावून खून केला तर दिड वर्षांचा मुलगा स्वरूप याला विष पाजून मारले. ही घटना आज शुक्रवार (दि ४ ) ला घडली. पोलिसांनी ज्ञानेश्‍वर काशिनाथ काळे याला ताब्यात घेतले असून, अन्य दोघांना सायंकाळी उशीरापर्यंत ताब्यात घेण्याचे काम सुरु होते.

या बाबतीत मिळालेली माहिती अशी की, कासारी येथील ज्ञानेश्वर काशिनाथ काळे याचा विवाह मनमाड येथील चिंतामण कृष्ण देवरे यांची मुलगी सुवर्णा हिच्यासोबत झालेला होता. विवाह झाल्यापासून ज्ञानेश्वर सुवर्णाच्या चारित्र्यावर संशय घेत तिला मारहाण करून मानसिक छळ करीत असे शिवाय दीड वर्षाचा स्वरुप हा मुलगा आपल्या पोटचा नाही असे म्हणत तो सुवर्णाला छळत होता, अशी फिर्याद सुवर्णाचे वडील चिंतामण यांनी पोलिसांत दिली

गुरुवारी रात्री कासारी शिवारात राहत्या घरी सुरवातीला सुवर्णाचा गळफास लावून त्याने खून केला व त्यांनतर लहानग्या स्वरूपाला विष पाजले या घटनेत दोघा मायलेकांचा मृत्यू झाला. ग्रामीण रुग्णालयात सकाळी या मायलेकांचे शवविच्छेदन करण्यात आले. दुपारी कासारी गावात पोलिस बंदोबस्तात अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.