Nandurbar Police | जिल्हाधिकारी कार्यालयात पत्र आले अन् नंदुरबार पोलिसांनी रोखला बालविवाह; पोलिस अधीक्षकांनी केलं हे आवाहन

नंदुरबार : पोलीसनामा ऑनलाइन – Nandurbar Police | नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयात ( Nandurbar Collector Office) एक पत्र आले. त्याची जिल्हाधिकार्‍यांनी त्वरीत दखल घेऊन पोलिसांना आदेश दिला. त्यानुसार पोलिसांनी दोन्ही कुटुंबियांचे समुपदेशन करुन होणारा बालविवाह (Child Marriage) रोखला. 17 वर्षीय अल्पवयीन तरुणीचा बालविवाह रोखण्यास नंदुरबार पोलिसांना (Nandurbar Police) यश आले.

 

अक्कलकुवा तालुक्यातील (Akkalkuwa taluka) गदवाणी गावात एका 17 वर्षाच्या तरुणीचे तिच्या इच्छेविरुद्ध लग्न केले जात असल्याचे पत्र जिल्हाधिकारी कार्यालयाला मिळाले होते. याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाने ही बाब नंदुरबार पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील (SP P. R. Patil) यांना कळविली. पी. आर. पाटील (IPS PR Patil) यांनी या तक्रारीची गंभीर दखल घेऊन मोलगी पोलीस ठाण्याचे (Molgi Police Station) सहायक पोलीस निरीक्षक धनराज निळे (API Dhanraj Nile) यांना सांगून संबंधितांच्या भेटी घेऊन तातडीने हा बालविवाह रोखण्याचा आदेश दिला. (Nandurbar Police)

 

त्यानुसार धनराज निळे यांनी दोन्ही कुटुंबियांना पोलीस ठाण्यात बोलावले. त्यांच्याकडून माहिती घेतल्यावर मुलीचे वय 17 वर्षे असून ती अल्पवयीन असल्याचे आढळून आले. कायद्याने मुलीचे लग्नाचे वय 18 वर्षे निश्चित केले आहे. त्यामुळे आपण जर मुलीचे लग्न केले तर तो कायद्यानुसार गुन्हा ठरेल. त्याचप्रमाणे 18 वर्षांपेक्षा कमी वयात मुलींचे विवाह झाल्यास त्याचा परिणाम मुलीच्या शारीरीक व मानसिक स्वास्थावर होतो.
कमी वयात मुलींचे विवाह झाल्यास जन्माला येणार्‍या अपत्यावर देखील त्याचा विपरीत परिणाम होतो, असे समजावून सांगितले.
दोन्ही पक्षाकडील लोकांनी मान्य केले. मुलीचे वय 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतरच नियोजित मुलासोबत लग्न लावून देण्यात येईल, असे लेखी जबाब तसेच हमी पत्र लिहून दिले.

 

पोलीस अधीक्षकांचे आवाहन –

 

“पालकांनी मुलीचे वय 18 वर्षे व मुलाचे वय 212 वर्षे पूर्ण झाल्यावर त्यांचे विवाह करावे.
तसेच अशा प्रकारचे बालविवाह नंदुरबार जिल्ह्यात कोठे होत
असल्यास त्याबाबतची माहिती तात्काळ नजीकच्या पोलीस ठाण्यात किंवा
नियंत्रण कक्षाला कळवावी,” असे आवाहन पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी केले आहे.

 

Web Title :-  Nandurbar Police | Letter received from Collector’s Office nandurbar police stopped child marriage; The appeal was made by the Superintendent of Police PR Patil

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update