Nandurbar Police News |  नंदूरबार जिल्हा पोलिस दलाची एक लाख वृक्ष लागवडीची मोहीम पूर्ण, विशेष पोलीस महासंचालकांच्या हस्ते वृक्षारोपण करुन शेवटचा टप्पा पूर्ण

नंदुरबार : पोलीसनामा ऑनलाइन – Nandurbar Police News |  नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील (Nandurbar SP P.R. Patil) यांच्या संकल्पनेतून एक लाख वृक्ष लागवड (Tree Plantation) मोहीम राबविण्यात आली आहे. नाशिक विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक (Nashik Division Special IG) डॉ. बी. जी. शेखर पाटील (Dr. B. G. Shekhar Patil)  यांच्या हस्ते शेवटच्या टप्प्यात वृक्ष लागवड करुन 1 लाख वृक्ष लागवडीचा संकल्प शुक्रवारी (दि.18) पूर्ण करण्यात आला. (Nandurbar Police News)

यावर्षी जिल्हा पोलीस दलाने नंदुरबार जिल्ह्यातील 12 पोलीस ठाणे व पोलीस मुख्यालय, जिल्ह्यातील विविध शाळा, महाविद्यालय, पडीक जमीन, माळरान इत्यादी ठिकाणी एक लाख वृक्ष लागवडीचा संकल्प केला होता. जिल्ह्यातील विविध सामाजीक संस्था, शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी, स्थानिक नागरिक यांच्या मदतीने 95 हजार वृक्षलागवड करण्यात आली होती. उर्वरीत पाच हजार वृक्षलागवडीचा अंतिम टप्पा शहादा तालुक्यातील (Shahada Taluka) दुधखेडा धरण (Dudhkheda Dam) परिसरात करण्याचे नियोजन करण्यात आले होते. त्यानुसार नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी.जी. शेखर पाटील यांच्या हस्ते वृक्षलागवड करुन शेवटचा टप्पा पूर्ण करण्यात आला. या कार्य़क्रमाला पोलीस दल, वनविभाग, दुधखेडा, मानमोड्या येथील ग्रमस्थ व विद्यार्थी यांनी 5 हजार वृक्ष लागवड करुन नंदुरबार जिल्हा पोलीस दलाचा एक लाख वृक्षलागवडीचा संकल्प पूर्ण केला. (Nandurbar Police News)

भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त (Indian Independence Amrit Mahotsav) नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे मागील वर्षी 75 हजार वृक्षलागवडीचा संकल्प करुन तो 15 ऑगस्ट 2022 रोजी पूर्ण करण्यात आला. यावर्षी एक लाख वृक्ष लागवडीच्या संकल्पाची सुरुवात जुलै 2023 मध्ये नंदुरबार जिल्हा पोलीस दलाने उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भांगडा गावच्या शिवारात वन विभागाच्या क्षेत्रावर वृक्षारोपण करुन शुभारंभ केला होता.

पर्यावरणाचा समतोल राखणे प्रत्येकाची जबाबदारी

यावेळी मनोगत व्यक्त करताना पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील म्हणाले, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी सांगितल्याप्रमाणे पर्यावरणाचा समतोल राखणे ही प्रत्येक नागरिकाची सामाजिक जबाबदारी आहे. त्यासाठी प्रत्येक नागरिकाने पर्यावरणाचा समतोल कसा राहिल यादृष्टीने सर्वतोपरी प्रयत्न केले पाहिजे, त्याप्रमाणे नंदुरबार जिल्हा पोलीस दल पर्यावरण संवर्धनासाठी भविष्यात कटिबद्ध राहिल असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

नंदुरबार पोलिसांच्या एक लाख वृक्ष लागवड संकल्पनेमध्ये वन विभाग, ग्रामपंचायती,
विविध सामाजीक संघटना, शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक व कर्मचारी
तसेच स्थानक नागरिक यांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग घेतल्याबद्दल
पी.आर पाटील यांनी सर्वांचे अभिनंदन करुन आभार मानले.

या कार्यक्रमाला नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील,
अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे (Addl SP Nilesh Tambe),
नंदुरबार वनविभागाचे उप वनरक्षक कृष्णा पवार (Krishna Pawar),
शहादा विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार (Shahada Division SDPO Datta Pawar),
शहाद्याचे उप विभागीय अधिकारी सुभाष माळी (Subhash Mali),
अक्कलकुवा विभागाचे उप विभागीय अधिकारी सदाशिव वाघमारे (Akkalkuwa Division SDPO Sadashiv Waghmare),
शहादा तहसीलदार दीपक गिरासे (Shahada Tehsildar Deepak Girase),
शहादा पोलीस ठाण्याचे (Shahada Police Station) पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत (PI Shivaji Budhwant)
यांच्यासह शहादा विभागातील सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार तसेच ग्रामस्त उपस्थित होते.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Nandurbar Police News |  नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील
यांच्या हस्ते 47 लांखांचा मुद्देमाल मूळ मालकांना परत