Nandurbar Police News |  नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील यांच्या हस्ते 47 लांखांचा मुद्देमाल मूळ मालकांना परत

नंदुरबार : पोलीसनामा ऑनलाइन – Nandurbar Police News |  नंदुरबार जिल्ह्यातुन चोरीस गेलेले मोबाईल, सोन्याचे दागिने, दुचाकी, रोख रक्कम हस्तगत करण्यात नंदुरबार पोलीस दलाला (Nandurbar Police News) यश आले आहे. नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक (Nashik Division Special IG) बी. जी. शेखर पाटील (B. G. Shekhar Patil)  यांच्या हस्ते नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात (Nandurbar City Police Station) झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी हस्तगत केलेला मुद्देमाल मूळ मालकांना परत देण्यात आला आहे. तब्बल 47 लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी परत केला.

नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील शुक्रवारी (दि.18) आगामी सण, उत्सवाच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा (Law and Order) आणि गुन्ह्यांचा आढावा घेण्यासाठी  शहर पोलीस ठाण्यात आले होते. त्यावेळी दरोडा (Robbery), जबरी चोरी, घरफोडी (Burglary), वाहन चोरी (Vehicle Theft) यासारख्या जिल्ह्यातील मालमत्तेच्या गुन्ह्यात पोलिसांनी (Nandurbar Police News)  तपास करुन जप्त केलेला मुद्देमाल मुळ मालकांना (Return To Original Owners) देण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

नंदुरबार जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात नोंद असलेल्या गहाळ मोबाईल बाबत जिल्हा पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील (Nandurbar SP P.R. Patil) यांनी माहिती घेतली असता मोठ्या प्रमाणात मोबाईल हरवल्याच्या (Lost Mobiles) तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारींचे स्थानिक गुन्हे शाखेचे (Local Crime Branch (LCB) पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर (PI Kiran Kumar Khedkar) यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तांत्रिक विश्लेषण केले. पोलिसांनी नंदुरबार, धुळे, जळगाव, गुजरात, मध्य प्रदेशात जावुन त्यांचा शोध घेऊन मोबाईल हस्तगत केले. हस्तगत करण्यात आलेले 12 लाख रुपये किंमतीचे 125 मोबाईल विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या हस्ते मुळ तक्रारदारांपैकी 15 जणांना प्रातिनिधीक स्वरुपात परत करण्यात आले.

याशिवाय पोलीस दलाकडून उघडकीस आलेल्या दरोडा, जबरी चोरी, घरफोडी,
वाहन चोरी सारख्या जिल्ह्यातील 30 गुन्ह्यातील 35 लाख 97 हजार 34 रुपये किमतीचे
सोन्याचे दागिने (Gold Jewelry), मोटार सायकल, रोख रक्कम व इतर मुद्देमाल मुळ मालकांना परत करण्यात आला.
नंदुरबार पोलिसांनी एकूण 48 लाख रुपयांचा मुद्देमाल मुळ मालकांना परत केला आहे.
यावेळी सौभाग्यचं लेणं परत मिळाल्याने अनेकांच्या डोळ्यात अश्रू आले.
तक्रारदारांनी आपली वस्तू परत मिळाल्याने पोलिसांचे आभार मानले.

कार्यक्रमावेळी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील, अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे (Addl SP Nilesh Tambe),
नंदुरबार विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन (Nandurbar Division SDPO Sanjay Mahajan),
शहादा विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार (Shahada Division SDPO Datta Pawar),
अक्कलकुवा विभागाचे उप विभागीय अधिकारी सदाशिव वाघमारे (Akkalkuwa Division SDPO Sadashiv Waghmare),
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर, नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे
पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर (PI Ravindra Kalamkar) यांच्यासह सर्व विभागातील अधिकारी व अंमलदार उपस्थित होते.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Income Tax Return | इन्कम टॅक्स न भरल्यास आता भरावा लागणार 10,000 रुपयांपर्यंत दंड