मोदी सरकार 50 कोटी कर्मचार्‍यांसाठी ‘हा’ नवीन कायदा आणणार, तुमचा फायदा होणार का ? जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जर तुम्ही खासगी कंपनीत काम करत असाल आणि त्यांच्या नियम आणि अटींनी त्रस्त असाल तर हि तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. यासाठी केंद्र सरकार लवकरच नवीन कायदा आणणार असून यामुळे खासगी कंपन्यांना यापुढे किमान वेतनाच्या कमी वेतन देता येणार नाही. हा नवीन नियम राज्य सरकारांसाठी देखील लागू होणार आहे. त्याचबरोबर अन्य नियमांची पूर्तता करणे देखील या कंपन्यांना बंधनकारक असणार आहे.

यासाठी केंद्र सरकार ‘नॅशनल मिनिमम फ्लोर वेज विधेयक’ आणणार असून केंद्रीय मंत्री संतोष गंगवार यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे. केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्री संतोष गंगवार यांनी एका कार्यक्रमात याविषयी सांगितले. त्याचबरोबर पुढे बोलताना सांगितले कि, देशातील अनेक कंपन्या मोठ्या प्रमाणात नफा कमवून देखील आपल्या कामगारांना किमान वेतन देत नाहीत. या कायद्यामुळे या कंपन्यांना चाप बसणार असून त्यांना हा नियम पाळणे बंधनकारक होणार आहे.

त्याचबरोबर कामगारांची नोंद ठेवणे देखील कंपन्यांना बंधनकारक करण्यात आले आहे. कामगारांच्या तपासणीमध्ये देखील मोठे बदल करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर या सर्व कामगारांची नोंद हि ऑनलाईन होणार असून हि सर्व आकडेवारी 48 तासाच्या आत वेबसाईटवर अपलोड करण्यात येणार आहे. दरम्यान, यामुळे जवळपास 50 कोटी कामगारांना फायदा होणार असून जी सर्व प्रक्रिया केंद्र सरकारमार्फत एकाच कार्यालयातून करण्यात येणार आहे.

आरोग्यविषयक वृत्त –