दोन गायींवर हल्ला करणारा बिबट्या आढळला मृतावस्थेत 

येवला : पोलीसनामा ऑनलाईन – येवला तालुक्यातील अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत बिबट्या ठार झाल्याची घटना समोर आली आहे. अज्ञात वाहनाच्या धडकते बिबट्या जागीच ठार झाल्याचे समजत आहे. वनविभागाने अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली आहे. येवला तालुक्यातील पिंपळगाव जलाल शिवारात मनमाड-नगर राज्य महामार्गालगत आज (गुरुवारी दि- २१) सकाळी एक बिबट्या मृतावस्थेत आढळून आला होता.

मनमाड-नगर राज्य महामार्गालगत बिबट्या मृतावस्थेत आढल्याचे कळताच वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सकाळीच तात्कळ घटनास्थळी धाव घेतली. यानंतर या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी बिबट्याचा मृतदेह ताब्यात घेतला. यानंतर हा मृतदेह तात्काळ येवला येथील पशुवैद्यकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, दोन ते तीन वर्षे वयोगटातील हा नर जातीचा बिबट्या असल्याचं समजत आहे.

बिबट्याचा गायींवर हल्ला
नाशिक तालुक्याच्या हद्दीवर असलेल्या लोहशिंगवे येथील दोन गायींवर बिबट्याने हल्ला केला आहे. या हल्ल्यात एका गायीचा मृत्यू झाला आहे. मुख्य म्हणजे दोनपैकी एका गाईचा मृत्यू झाला आहे, तर दुसरी गाय गायब आहे. असे समजत आहे. यानंतर गायब असणारी दुसरी गाय बिबट्याच्या हल्ल्याच्या भीतीनं पळून गेली की बिबट्यानं नेली, याचा शोध ग्रामस्थ घेत आहेत. लोहशिंगवे येथे पहाटे तीन वाजेच्या सुमारास निवृत्ती भिमा जुंद्रे यांच्या मळ्यात या दोन गायी दावनीला बांधल्या होत्या. याच गायींवर बिबट्याने हल्ला केला आहे. दरम्यान या घटनेमुळे ग्रामस्थही भयभीत झाले आहेत.