नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – कळवण तालुक्यातील वेरुळे गावी शनिवारी वृद्ध दाम्पत्याची कुऱ्हाडीचा घाव घालून निर्घृण हत्या (Nashik Crime) केल्याचा प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणात धक्कादायक बाब म्हणजे नातवानेच आपल्या आजी-आजोबांची हत्या केली. हत्याकांडानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरविली. त्यात त्यांना नातूच खरा मारेकरी (Nashik Crime) असल्याचे आढळून आले. आरोपी नातू काळू कोल्हे हा सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे.
नारायण कोल्हे आणि सकूबाई कोल्हे अशी वृद्ध दाम्पत्याची नावे आहेत. कौटुंबिक वाद आणि पैशांच्या वादातून ही हत्या झाल्याचे तपासात उघड झाले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोल्हे दाम्पत्यासोबत त्यांचा भाचा रामदास भोये हा राहायला होता. यावेळी तो बाहेर असताना त्यांचा नातू वरखेडा येथून आजी-आजोबांना भेटण्यासाठी येऊन गेला होता. पोलिसांनी काळू कोल्हे याला ताब्यात घेऊन बोलते केले.
पैशांची मागणी आणि कौटुंबिक वाद यातून त्याने ही हत्या केल्याचे कबूल केले. याबाबत अधिक तपास अभोणा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक नितीन शिंदे करत आहेत.
Web Title :- Nashik Crime | grandson kills grandparents for money nashik crime news
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Aamir Khan | आमिर खानच्या आयुष्यातील ‘तो’ प्रसंग सांगताना त्याला आश्रू अनावर; व्हिडिओ व्हायरल
Pune Pimpri Crime | दुधिवरे खिंडीत सहलीतील विद्यार्थ्यांची बस खोल दरीत कोसळली; 3 जण गंभीर जखमी