Kraigg Braithwaite | क्रेग ब्रेथवेटने ऑस्ट्रेलियात केला विक्रम! अशी कामगिरी करणारा वेस्ट इंडीजचा तिसरा कर्णधार

पोलीसनामा ऑनलाइन : Kraigg Braithwaite | वेस्ट इंडीज आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या पर्थ कसोटीत ऑस्ट्रेलियाने आपले वर्चस्व निर्माण केले आहे. या कसोटीत अनेक मोठे विक्रम झाले आहेत. ऑस्ट्रेलियाच्या मार्नस लाबुशेन याने पहिल्या डावात द्विशतक आणि दुसऱ्या डावात शतक करून मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. ऑस्ट्रेलियाने विजयासाठी ठेवलेल्या 498 धावांचा पाठलाग करताना वेस्ट इंडीजने चौथ्या दिवसअखेर 3 बाद 192 धावा केल्या आहेत. त्यांना आता जिंकण्यासाठी शेवटच्या दिवशी 309 धावा करायच्या आहेत. या कसोटीत वेस्ट इंडीजचा कर्णधार क्रेग ब्रेथवेट याने चौथ्या डावात एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला. (Kraigg Braithwaite)

काय आहे विक्रम?

ब्रेथवेटने वेस्ट इंडीजकडून एका बाजूने खिंड लढवत 188 चेंडूंत 13 चौकारांच्या मदतीने 110 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाच्या मैदानावर चौथ्या डावात शतक झळकावणारा तो विंडीजचा तिसरा कर्णधार ठरला आहे. ब्रेथवेटच्या अगोदर 1952 मध्ये जेफ्री स्टोलमेयर यांनी 104 धावा केल्या होत्या. त्यानंतर 1969 मध्ये गॅरी सोबर्स यांनी सिडनी कसोटीत 113 धावा केल्या होत्या. या विक्रमासाठी वेस्ट इंडीजला तब्बल 53 वर्षे वाट पाहवी लागली होती.

ऑस्ट्रेलियाच्या मार्नस लाबुशेनचा पराक्रम

या पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने पहिला डाव 4 बाद 598 धावांवर घोषित केला आणि प्रत्युत्तरात विंडीजचा संघ 283 धावांवर गडगडला. फॉलोऑन न देता ऑस्ट्रेलियाने दुसरा डाव 2 बाद 182 धावांवर घोषित करून विंडीजसमोर 498 धावांचे लक्ष्य ठेवले. ऑस्ट्रेलियाकडून पहिल्या डावात मार्नस लाबुशेन (204) आणि स्टीव्ह स्मिथ (200*) यांनी द्विशतकी खेळी केली होती. यानंतर मार्नसन लाबुशेन याने दुसऱ्या डावातही 110 चेंडूंत 13 चौकार व 2 षटकारांसह नाबाद 104 धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीमुळे त्याच्या नावावर मोठा विक्रम झाला आहे. एकाच कसोटीत द्विशतक व शतक झळकावणारा मार्नस लाबुशेन हा ऑस्ट्रेलियाचा तिसरा अन् जगातील 8 वा फलंदाज ठरला आहे. (Kraigg Braithwaite)

एकाच कसोटीत द्विशतक व शतक झळकावणारे खेळाडू

डॉज वॉल्टर्स ( वि. वेस्ट इंडीज, 1969)
सुनील गावस्कर ( वि. वेस्ट इंडीज, 1971),
लॉरेन्स रोव ( वि. न्यूझीलंड, 1972),
ग्रेग चॅपेल ( वि. न्यूझीलंड, 1974)

Web Title :-Kraigg Braithwaite | aus vs wi 1st test west indies 1923 on day 4 stumps they need 306 on the final day kraigg braithwaite the captain unbeaten on 101 register big record

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Power Supply Off | शिवाजीनगर आणि डेक्कन परिसरात उद्या (रविवार) सकाळी ‘या’ वेळेत होणार बत्ती गूल

Raj Thackeray | ‘राज्यात फोडाफोडीचे राजकारण सुरू; पण माझा महाराष्ट्र सैनिक…’ – राज ठाकरे