Nashik Crime News | आई-बाबांना शेतात मदत करायला गेली असताना 17 वर्षीय तरुणीचा सर्पदंशाने मृत्यू

नाशिक : पोलीसनामा ऑनलाईन – Nashik Crime News | नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये राजापूर येथील एका 17 वर्षीय मुलीचा सर्पदंशाने मृत्यू झाला आहे. या तरुणीला वेळेवर उपचार न मिळाल्याने तिचा मृत्यू झाल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात आला आहे. प्रगती हनुमान वाघ असे सर्पदंशाने मृत्यू झालेल्या 17 वर्षीय तरुणीचे नाव आहे. या घटनेमुळे वाघ परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. (Nashik Crime News)

काय आहे नेमके प्रकरण?
नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील राजापूर या ठिकाणची 17 वर्षीय विद्यार्थिनी प्रगती वाघ हि शाळेला सुट्टी असल्यामुळे आपल्या आई-वडिलांबरोबर शेतात काम करत होती. काम करत असताना अचानक तिला सर्पदंश झाला. यानंतर तिने त्याच परिस्थितीत राजापूर ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली, मात्र त्या वेळेस ती बेशुद्ध झाली. यावेळी ग्रामीण रुग्णालयामध्ये रुग्णवाहिकाच वेळेवर हजर नसल्याने तिला खाजगी वाहनाने येवला ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. ती उपचारांना साथ देत नसल्याने तिला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र काल पहाटेच्या सुमारासअखेर तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. (Nashik Crime News)

यानंतर ग्रामस्थ आक्रमक झाले असून त्यांनी आरोग्य विभागाच्या निष्काळजीपणामुळे मुलीला जीव गमवावा लागल्याचा आरोप केला आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर आणि ॲम्बुलन्स उपलब्ध झाली असती तर या मुलीचा जीव वाचला असता अशा प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केल्या आहेत. तसेच गैरहजर असलेल्या डॉक्टरांची देखील चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणीदेखील ग्रामस्थांनी स्थानिक प्रशासनाकडे केली आहे.

Web Title :- Nashik Crime News | 17 years old girl dies of snake bite villagers claim medical negligance

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Aurangabad Crime News | परीक्षेच्या तणावातून तरुणाने उचलले ‘हे’ पाऊल; औरंगाबाद हादरलं

Sonu Nigam | चेंबूर येथील कार्यक्रमादरम्यान झालेल्या धक्काबुक्कीवर सोनू निगमने दिली ‘ही’ प्रतिक्रिया; म्हणाले…

Pune Crime News | प्रवासी तरुणीशी लगट करण्याचा प्रयत्न आला अंगाशी; पीएमपीच्या बस कंडक्टरला अटक