
Sonu Nigam | चेंबूर येथील कार्यक्रमादरम्यान झालेल्या धक्काबुक्कीवर सोनू निगमने दिली ‘ही’ प्रतिक्रिया; म्हणाले…
पोलीसनामा ऑनलाईन : काल प्रसिद्ध गायक सोनू निगम (Sonu Nigam) यांच्या कॉन्सर्ट दरम्यान धक्काबुक्की झाल्याचा व्हिडिओ जोरात व्हायरल झाला होता. आता त्या धक्काबुक्कीवर सोनू निगमने पहिली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी नेमके काय झाले आणि कोणी धक्काबुक्की केली यांचेही नाव त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे. या घटनेची माहिती स्वतः सोनू निगमने (Sonu Nigam) दिली आहे.
पुढे बोलताना सोनू निगम म्हणाला, “काहीही झालेलं नाही. कॉन्सर्ट झाल्यानंतर आम्ही स्टेजवरून खाली उतरत होतो. आजकाल लोक सेल्फी आणि फोटोच्या नादात काय करतात हे त्यांना समजत नाही. स्वप्निल नावाच्या व्यक्तीने मला त्याचे नाव नंतर कळाले. पहिल्यांदा त्यांनी मला पकडल्यामुळे मला वाचवण्यासाठी हरिप्रकाश माझ्या जवळ आले. त्याने हरीला जोरात धक्का दिला. त्यानंतर त्यांनी मलाही धक्का दिला त्यामुळे मीही पडलो. जर मी स्टेजच्या बाजूला असतो तर मी स्टेजच्या खाली पडलो असतो. मी पडल्यानंतर मला वाचवण्यासाठी रब्बानी पुढे आले. रब्बानीना तर त्याने जोरात धक्काच दिला ते मागेच आदळले . नशीब वाचले नाही तर त्यांचा जीव गेला असता, त्यांच्या मागे लोखंड होता यामुळे त्यांचा मृत्यूही झाला असता”.
Singer Sonu Nigam who raised his voice about Azan Loudspeakers attacked by Janab Uddhav Thackeray MLA Prakash Phaterpekar and his goons in music event at Chembur. Sonu has been taken to the hospital nearby. pic.twitter.com/32eIPQtdyM
— Sameet Thakkar (@thakkar_sameet) February 20, 2023
काल सोमवारी चेंबूर येथे एक संगीत कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते तर या कार्यक्रमाला सोनू निगम (Sonu Nigam) सह त्यांचे काही सहकलाकार देखील उपस्थित होते. यावेळी कार्यक्रम झाल्यानंतर सोनू निगम मंचावरून खाली उतरत असताना ही संपूर्ण घटना घडली आणि या धक्काबुक्कीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल होताना दिसत आहे.
तर या धक्काबुक्कीत सोनू निगम व त्यांचा एक सहकारी जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल
करण्यात आले आहे. या घटनेनंतर चेंबूर पोलीसात सोनू निगमने तक्रार दाखल केली आहे.
तर याप्रकरणी गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.
तर सोनू निगमला धक्काबुक्की करणाऱ्या आरोपीचे नाव स्वप्निल फेटरपेकर असल्याची माहिती पोलीस उपायुक्त हेमराजसिंह राजपूत यांनी दिली आहे.
Web Title :- Sonu Nigam | sonu nigam first reaction on manhandling with him in chembur music concert mumbai
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Bela Bose Passed Away | ज्येष्ठ अभिनेत्री आणि शास्त्रीय नृत्यांगना बेला बोस यांचे निधन
IND vs AUS | ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का ! ‘हे’ दोन मॅच विनर खेळाडू टीममधून बाहेर