Nashik Crime News | पोलिसांच्या ताब्यातून पळून गेलेल्या चोरट्याला जालन्यातून अटक, नाशिक गुन्हे शाखेची कारवाई

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – Nashik Crime News | पाणी पिण्याच्या बहाण्याने इंदिरानगर पोलिसांच्या ताब्यातून पसार झालेल्या चोरट्याला नाशिक पोलिसांच्या (Nashik Crime News ) गुन्हे शाखेच्या युनिट दोनने (Nashik Police Crime Branch) अटक केली आहे. गेली दहा दिवस तो पोलिसांना गुंगारा देत होता. जालना जिल्ह्यातील एका गावात तो लपून बसला होता. विशाल ज्ञानेश्वर तिनबोटे (वय-20 रा. म्हसोबा मंदीराजवळ, साठेनगर, नाशिक) असे अटक (Arrest) केलेल्या आरोपीचे नाव आहे.

इंदिरानगर घरफोडी चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी विशाल तिनबोटे याला गेल्या सोमवारी (दि. 18) युनिट दोनच्या पथकाने अटक केली होती. पुढील कार्य़वाही करीता इंदिरानगर पोलीस ठाण्यात (Indiranagar Police Station) त्याला हजर करण्यात आले होते. त्याच्यावर अटकेची कारवाई करत असताना त्याने पाणी प्यायचे आहे असे सांगितले. तपासी अंमलदार त्याला पाणी पिण्याकरीता पोलीस ठाण्यातील पाण्याच्या कुलरकडे घेऊन गेले. पोलीस अंमलदार यांची नजर चुकवून तेथील भिंतीवरुन उडी मारुन आरोपी पळून गेला. (Nashik Crime News)

आरोपीचा गुन्हे शाखा युनिट दोन कडून शोध सुरु असताना पोलीस हवालदार परमेश्वर दराडे यांना आरोपी जालना येथे
पळून गेल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पथकाने जालना येथे जाऊन स्थानिक पोलिसांच्या मदतीने आरोपीचा शोध घेतला.
त्यावेळी आरोपी घनसांगवी तालुक्यातील उक्कडगाव येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
पोलिसांनी उक्कडगाव येथे जाऊन शोध घेत असताना तो गोदावरी नदी पात्राजवळ (Godavari River) असल्याची माहिती मिळाली. पोलीस आरोपीला ताब्यात घेत असताना तो नदीपात्रात पळून जाऊ लागला. त्यावेळी पोलीस पथकाने त्याचा नदी पात्रात पाठलाग करुन त्याला ताब्यात घेतले. त्याला पुढील कार्यवाही करीता इंदिरानगर पोलीस ठाणे येथे हजर केले आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णीक (IPS Sandeep Karnik), पोलीस उपायुक्त गुन्हे प्रशांत बच्छाव
((DCP Prashant Bachhav)) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रणजित नलवडे (PI Ranjit Nalwade),
पोलीस उपनिरीक्षक संदेश पाडवी (PSI Sandesh Padavi), परमेश्वर दराडे, सुनील आहेर यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Pimpri Chinchwad Crime News | पूर्ववैमनस्यातून येरवडा कारागृहात कैद्याचा खून, प्रचंड खळबळ

Bhima Koregaon Shaurya Din | विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी पुणे पोलिसांचा मोठा बंदोबस्त; पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी दिली सविस्तर माहिती

IPS Ritesh Kumar | पुण्यातील गुन्हेगारी नियंत्रणात, मुंबई पेक्षा जास्त पुण्यात प्रतिबंधात्मक कारवाई – पोलीस आयुक्त रितेश कुमार (Video)

Pune PMC News | नव्याने तयार केलेल्या रस्त्यावर केबलसाठी विनापरवाना ‘खोदाई’

Manoj Jarange Patil On CM Eknath Shinde | मनोज जरांगे यांची पहिल्यांदाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका, ”आता आम्हाला त्यांच्यावर विश्वास…”