Nashik Crime News | पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या

नाशिक : पोलीसनामा ऑनलाईन – Nashik Crime News | काही दिवसांपूर्वी दारूच्या नशेत पतीने मारहाण (Beating) केल्याने पत्नीचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना नाशिकमधील चुंचाळे परिसरात आणखी एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीने तिची हत्या (Murder) करून स्वतः गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केली आहे. (Nashik Crime News)

काय आहे संपूर्ण प्रकरण?
भुजंग अश्रू तायडे ( वय 35) आणि पत्नी मनीषा भुजंग तायडे ( वय 30) अशी या पती- पत्नीची नावे आहेत. हे दांपत्य अंबड चुंचाळे येथील घरकुल इमारत क्रमांक 19 या ठिकाणी राहत होते. घटनेच्या दिवशी या दोघां पती-पत्नींमध्ये मोठा वाद झाला. हा वाद टोकाला गेल्याने भुजंगने मनिषावर धारदार शस्त्राने वार करत तिची हत्या केली आणि नंतर त्याने घराच्या किचनमधील फॅनला गळफास घेऊन आत्महत्या केली. हि घटना घडली तेव्हा घरात कोणीही नव्हते. त्यांची दोन्ही मुले क्लासला गेले होते. (Nashik Crime News)

संध्याकाळी साडेसात वाजेच्या सुमारास मुले क्लासवरून आल्यानंतर त्यांनी दार वाजवलं.
मात्र कुणीच दार न उघडल्याने त्यांनी शेजारच्यांना हि गोष्ट सांगितली.
यानंतर शेजारच्यांनी दरवाजा उघडल्यानंतर त्यांना मनीषा यांचा मृतदेह रक्तबंबाळ अवस्थेमध्ये आढळून आला तर भुजंग याने आत्महत्या केल्याचे आढळून आले.
यानंतर नागरिकांनी याची माहिती अंबड पोलिसांना दिली. या घटनेची माहिती मिळताच अंबड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनास्थळाचा पंचनामा केला.
अंबड पोलिसांनी या दोघांचे मोबाईल ताब्यात घेऊन पुढील तपासाला सुरुवात केली आहे.
भुजंग आणि मनीषा यांच्या पश्चात दोन मुले आहेत. आई-वडील सोडून गेल्याने हि दोन्ही मुले अनाथ झाली आहेत.
या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Web Title :- Nashik Crime News | the brother and sister came home and broke the door and found dead body of the parents

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | परीक्षा परिषदेच्या आयुक्त शैलजा दराडे यांच्यासह भावावर गुन्हा दाखल; शिक्षक म्हणून नोकरीचे आमिष दाखवून ४५ जणांची केली कोट्यांवधीची फसवणूक

Umesh Yadav Father Passed Away | भारताचा वेगवान गोलंदाज उमेश यादवच्या वडिलांचे निधन