Nashik-Jalgaon-Bhusawal ACB Trap | नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग : जळगाव- भुसावळ तहसिल कार्यालय – 12 हजाराच्या लाच प्रकरण कोतवालासह दोघे अ‍ॅन्टी करप्शनच्या ‘रडार’वर

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – Nashik Jalgaon Bhusawal ACB Trap | शेत जमिनीच्या 7/12 उतार्‍यावर नाव लावण्यासाठी 15 हजार रूपयाच्या लाचेची मागणी (Demand Of Bribe) करून 12 हजार रूपयाची लाच घेतल्याप्रकरणी जळगावच्या लाचलचुपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau Jalgaon) सध्या भुसावळ तहसिल कार्यालयात कार्यरत असलेल्या लोकसेवकासह एका खासगी व्यक्तीविरूध्द भुसावळ शहर पोलिस ठाण्यात (Bhusawal City Police Station) गुन्हा दाखल केला आहे. (Nashik Jalgaon Bhusawal ACB Trap)

रविंद्र लक्ष्मण धांडे Ravindra Laxman Dhande (54, कोतवाल, सजा तलाठी भुसावळ, हल्ली नेमणूक – तहसिल कार्यालय, भुसावळ, जि. जळगाव) आणि हरिष देविदास ससाणे Harish Devidas Sasane (44, रा. आंबेडकर नगर, भुसावळ, ता. भुसावळ, जि. जळगांव – खाजगी इसम) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Nashik Jalgaon Bhusawal ACB Trap)

याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांनी सन 2022 मध्ये भुसावळ तालुक्यातील कुर्‍हे पानाचे या गावात स्वतःच्या नावावर सुमारे 2 एकर शेतजमीन विकत घेतली होती. सदर शेत जमिनीच्या 7/12 उतार्‍यावर तक्रारदार यांचे स्वतःचे नाव लावण्यासाठी त्यांनी कुर्‍हे पानाचे येथील तलाठी कार्यालयात प्रकरण सादर केले होते. सदर प्रकरणात भुसावळ मंडळ अधिकारी योगिता पाटील (Bhusawal Mandal Officer Yogita Patil) यांनी त्रुटी काढून तक्रारदार यांना भुसावळ तहसील कार्यालयाचे कोतवाल रवींद्र धांडे यांना भेटण्यास सांगितले होते. (Jalgaon Bhusawal) Crime News)

मंडळ अधिकारी योगिता पाटील यांनी सांगितल्याप्रमाणे तक्रारदार हे कोतवाल रवींद्र धांडे यांना भेटले. त्यावेळी धांडे यांनी तक्रारदार यांना मी तुमचे 7/12 च्या उतार्‍यावर नाव मंडळ अधिकारी योगिता पाटील यांच्याकडून लावुन आणतो असे सांगुन 15 हजार रूपयाच्या लाचेची मागणी केली. तक्रारदार यांनी दि. 18 एप्रिल 2023 रोजी अ‍ॅन्टी करप्शनच्या विभागाकडे तक्रार दिली. तक्रारीची पंचासमक्ष पडताळणी केली असता धांडे यांनी तक्रारदाराकडे प्रथम 15 हजार व तडजोडीअंती 12 हजार रूपयांच्या लाचेची मागणी करून रक्कम ही हरिष ससाणे यांच्याकडे देण्यास सांगितली. (Maharashtra ACB Trap)

सरकारी पंचासमक्ष रविंद्र धांडे यांच्यासाठी हरिष ससाणे यांनी तक्रारदाराकडून 12 हजार रूपयांची लाच घेतली.
त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. धांडे आणि ससाणे यांच्याविरूध्द भुसावळ शहर पोलिस ठाण्यात गुन्हा
दाखल करण्यात आला आहे. (Jalgaon Bribery Case)

नाशिक परिक्षेत्राच्या पोलिस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर (SP Sharmistha Walawalkar),
अप्पर पोलिस अधीक्षक एन.एन. न्याहळदे (Addl SP Narayan Nyahalde), पोलिस उप अधीक्षक नरेंद्र पवार
(DySP Narendra Pawar) यांच्या मार्गदर्शनाखाली जळगावच्या अ‍ॅन्टी करप्शन विभागातील
पोलिस निरीक्षक संजोग बच्छाव (Police Inspector Sanjog Bachhav),
सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक दिनेशसिंग पाटील, पोलिस नाईक बाळू मराठे, पोलिस अंमलदार प्रदिप पोळ,
सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक सुरेश पाटील, पोलिस हवालदार अशोक अहिरे, पोलिस हवालदार सुनिल पाटील,
पोलिस हवालदार रविंद्र घुगे, महिला पोलिस हवालदार शैला धनगर, पोलिस नाईक जनार्दन चौधरी,
पोलिस नाईक किशोर महाजन, पोलिस नाईक सुनिल पाटील, पोलिस अंमलदार राकेश दुसाने, सचिन चाटे,
अमोल सुर्यवंशी आणि प्रणेश ठाकुर यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Web Title :- Nashik-Jalgaon-Bhusawal ACB Trap | Nashik Anti-Corruption Bureau: Jalgaon- Bhusawal Tahsil Office – 12,000 bribe case Kotwal and other one is on ‘radar’

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

NCP Chief Sharad Pawar | अजित पवार भाजपसोबत जाणार? शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं; म्हणाले- ‘ही चर्चा…’

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : चतुःश्रृंगी पोलिस स्टेशन – पांडवनगरमध्ये गुंडांचा राडा; टोळीच्या वर्चस्वातून तरुणावर जीवघेणा हल्ला करुन 4 चारचाकी, 14 दुचाकींची तोडफोड

Harshad Dhage – Pune News | समाजसेवक ‘हर्षद ढगे’, ‘फॉर फ्यूचर इंडिया’ मार्फत करतोय पर्यावरणाचं रक्षण

Maharashtra ACB Trap | लाचलचुपत प्रतिबंधक विभाग : सहाय्यक पोलिस निरीक्षकाकडून 5 लाखाच्या लाचेची मागणी, API सह पोलिस कर्मचारी ‘गोत्यात’

Dhananjay Munde | Perfectly Well, अजित पवारांना भेटण्यासाठी गेलेल्या धनंजय मुडेंचे सूचक विधान