NCP Chief Sharad Pawar | अजित पवार भाजपसोबत जाणार? शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं; म्हणाले- ‘ही चर्चा…’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – अजित पवार (Ajit Pawar) भाजपसोबत (BJP) जाणार असलेल्या चर्चांवर राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार नाराज ही केवळ तुमच्या मनातील चर्चा आहे. राष्ट्रवादीमध्ये सर्व काही अलबेल आहे, असे शरद पवार यांनी सांगितले. अजित पवार यांनी कोणतीही बैठक बोलवली नाही, असे देखील शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी स्पष्ट केलं.

शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) म्हणाले, सध्या ही चर्चा तुमच्या मनात आहे, ती आमच्या कुणाच्याही मनात नाही. या चर्चेला अजिबात महत्व नाही. काहीतरी बातम्या तयार करण्याचं काम कुणीतरी करत आहे. त्याला काहीही अर्थ नाही. मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षापुरतं सांगू शकतो. पक्ष आणि त्या पक्षात काम करणारे आमचे सगळे सहकारी एका विचाराने पक्षाला शक्तीशाली कसं करायचं या भूमिकेत आहेत. त्याशिवाय दुसरा कोणताही विचार कुणाच्या मनात नसल्याचे त्यांनी सांगितले.

यानंतर माझा देहूला कार्यक्रम आहे. त्यानंतर रात्री मुक्कामाला मी मुंबईला जाणार आहे.
मी वर्तमानपत्रात वाचलं की आमदारांची बैठक (MLA Meeting) वगैरे. 100 टक्के ही खोटी गोष्ट आहे.
अशी कोणतीही बैठक नाही. पक्षाचे प्रांताध्यक्ष हे सध्या मार्केट कमिट्यांच्या निवडणुकीच्या
(Market Committee Election) प्रचारात आहेत. अजित पवारही त्याच कामात आहेत. याशिवाय या कामात लक्ष घालण्याची जबाबदारी कुणावरही नाही. मी माझे ठरलेले कार्यक्रम पूर्ण करत आहे. मी या सगळ्यावर स्पष्टपणे सांगितल्यानंतर त्यात कुणालाही फाटे फोडण्याचा अधिकार नाही, असंही शरद पवार यांनी सांगितलं.

Web Title :-  NCP Chief Sharad Pawar | ncp sharad pawar reacts on ajit pawar joining government claims

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Chandrakant Patil |डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचे प्रलंबित प्रश्न तातडीने सोडवावे – उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील

CM Eknath Shinde On Kolhapur | कोल्हापुरातील रस्त्यांसाठी 100 कोटींचा निधी, उच्च न्यायालयाच्या सर्कीट बेंचसाठी पाठपुरावा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे