Dhananjay Munde | Perfectly Well, अजित पवारांना भेटण्यासाठी गेलेल्या धनंजय मुडेंचे सूचक विधान

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Political News) केंद्र बिंदू ठरलेल्या अजित पवारांबाबत (Ajit Pawar) चर्चा सुरु आहेत. त्यातच राष्ट्रवादीचे आमदार (NCP MLA) मुंबईत दाखल होत असल्याने राजकीय घडामोडींना वेग आल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) हे अजित पवार यांना भेटण्यासाठी पोहोचले आहेत. धनंजय मुंडे (Dhananjay Munde) नॉट रिचेबल असल्याची चर्चा सुरु होत्या. यासंदर्भात विचारले असता ‘ऑल इज वेल’ असल्याचं त्यांनी सांगितलं.

अजित पवार यांना भेटण्यासाठी आलेल्या धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना राष्ट्रवादीत All is Well आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर बोलताना ते म्हणाले, मतदारसंघातील कामासाठी मी मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या सचिवांना भेटण्यासाठी गेलो होतो. धनंजय मुंडे यांनी मंगलप्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) यांची भेट घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं होतं. कामांना स्थगिती देण्यात आल्या आहेत, त्याबाबत अजितदादांचं पत्र घेण्यासाठी मी विधानभवनात आलो होतो, असंही मुंडे यांनी स्पष्ट केलं.

मी पुन्हा प्रतिक्रिया देणार नाही- अजित पवार

राज्यात नव्या राजकीय समीकरणांच्या फक्त चर्चा होत आहेत. त्यात काही तथ्य नाही, अशी माहिती अजित पवार यांनी एका वृत्तवाहिनीला दिली. अजित पवार यांच्याकडे 53 पैकी 40 आमदारांच्या सह्याचे पत्र असल्याचे वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्राने दिले आहे. मात्र अजित पवार यांनी हे वृत्त फेटाळलं आहे. मी पुन्हा पुन्हा प्रतिक्रिया देणार नाही, मीडिया स्वत:च्या मनाने बातम्या चालवत आहे, असं अजित पवार म्हणाले.

15 दिवसात दोन राजकीय स्फोट होतील – सुप्रिया सुळे

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी मोठा दावा केला आहे. येत्या 15 दिवसांत दोन राजकीय स्फोट होणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे. एक स्फोट दिल्लीत आणि दुसरा महाराष्ट्रात होईल असे सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी सांगितले. एका हिंदी वृत्तवाहीनीने वृत्त दिले आहे.

इतरांना फाटे फोडण्याचा अधिकार नाही – शरद पवार

मी वर्तमानपत्रात वाचलं की आमदारांची बैठक (MLA Meeting) वगैरे. 100 टक्के ही खोटी गोष्ट आहे.
अशी कोणतीही बैठक नाही. पक्षाचे प्रांताध्यक्ष हे सध्या मार्केट कमिट्यांच्या निवडणुकीच्या
(Market Committee Election) प्रचारात आहेत. अजित पवारही त्याच कामात आहेत.
याशिवाय या कामात लक्ष घालण्याची जबाबदारी कुणावरही नाही. मी माझे ठरलेले कार्यक्रम पूर्ण करत आहे.
मी या सगळ्यावर स्पष्टपणे सांगितल्यानंतर त्यात कुणालाही फाटे फोडण्याचा अधिकार नाही,
असंही शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी सांगितलं.

Web Title :- Dhananjay Munde | dhananjay munde reached to meet ajit pawar in mumbai

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

NCP Chief Sharad Pawar | अजित पवार भाजपसोबत जाणार? शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं; म्हणाले- ‘ही चर्चा…’

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : चतुःश्रृंगी पोलिस स्टेशन – पांडवनगरमध्ये गुंडांचा राडा; टोळीच्या वर्चस्वातून तरुणावर जीवघेणा हल्ला करुन 4 चारचाकी, 14 दुचाकींची तोडफोड

Harshad Dhage – Pune News | समाजसेवक ‘हर्षद ढगे’, ‘फॉर फ्यूचर इंडिया’ मार्फत करतोय पर्यावरणाचं रक्षण