८ दिवसांपूर्वी शहीद झालेल्या केशव गोसावी यांना कन्यारत्न

नाशिक : पोलीसनामा ऑनलाईन – अतिरेक्यांनी सीमेवर केलेल्या अंदाधुंद गोळीबारात  शाहिद झालेल्या केशव गोसावी यांना रविवारी कन्यारत्न झाले आहे. सिन्नर तालुकयातील शिंदेवाडी गावाचे ते रहिवासी होते. सीमेवर झालेल्या हल्ल्यात ते शहीद झाले. गोसावी यांची पत्नी ९ महिन्याची गर्भवती होती. गेल्या आठवड्यातच ती प्रसूतीसाठी माहेरी जाणार होती. मात्र त्याआधीच पतीला वीर मरण आल्याचे वृत्त त्यांना कळाले आणि त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. सोमवारीच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
मुलगा होउदे वा मुलगी लष्करात भरती करायचंय … 
मुलगा अथवा मुलगी काहीही अपत्य झाले तरी त्याला लष्करात भरती करण्याचं स्वप्न केशव यांनी बघितले होते, मात्र मुलीच्या जन्माच्या  ८ दिवस आधीच देशाच्या सीमेचे रक्षण करता करता त्यांना वीरमरण प्राप्त झाले. सर्वस्व हरवून बसलेल्या गोसावी कुटुंबात आठ दिवसांनी सुखद घटना घडली असून घरात गोंडस परीचे परीचे आगमन झाले.
पाकिस्तान लष्कराने ११  नोव्हेंबर रोजी युद्धबंदीचं उल्लंघन केलं. यावेळी झालेल्या चकमकीत केशव गोसावी यांना गोळी लागली. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रुग्णालयात उपचार सुरु असताना गोसावी यांचं निधन झालं. गोसावी हे सिन्नर तालुक्यातील श्रीरामपूर गावचे रहिवासी आहेत. दरम्यान, गोसावी यांच्या कुटुंबियांना राज्य सरकारकडून २५ लाखाच्या मदतीची घोषणा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केली.

आजोबा आपल्यासोबत ‘मन्नत’ मध्ये का राहत नाहीत ? चिमुकल्या अबरामचा बिग बींना प्रश्न