Coronavirus : 6 महिन्यानंतर अडीच लाखांच्या खाली आली सक्रीय प्रकरणे, प्रति 10 लाख लोकसंख्येवर भारतात सर्वात कमी केस

नवी दिल्ली : वृत्त संस्था – देशात कोरोना संसर्गाच्या सक्रीय प्रकरणांचा आकडा मागील सहा महिन्यानंतर अडीच लाखांच्या खाली आला आहे. नवीन प्रकरणांपेक्षा सुमारे तीन हजार पेक्षा जास्त रूग्ण बरे झाले आहेत आणि आतापर्यंत महामारीवर मात दिलेल्या लोकांची संख्या 99 लाखांपेक्षा जास्त झाली आहे. महामारीमुळे प्रतिदिन होणार्‍या मृत्यूंची संख्या सुद्धा अडीचशेने खाली राहीली आहे. आरोग्य मंत्रालयानुसार, मागील एक आठवड्यादरम्यान भारतात प्रति 10 लाख लोकसंख्येवर संक्रमितांची संख्या सर्वात कमी (101) राहीली आहे.

आतापर्यंत 17.48 कोटी टेस्ट
भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनुसार (आयसीएमआर) कोरोना संसर्गाचा शोध घेण्यासाठी आतापर्यंत देशभरात 17.48 कोटीपेक्षा जास्त सॅम्पल तपासण्यात आले आहेत. यामध्ये शनिवारी तपासण्यात आलेले 9.58 लाख नमूनेसुद्धा समाविष्ट आहेत.

प्रति 10 लाख लोकसंख्येवर भारतात सर्वात कमी केस
आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, मागील एक आठवड्यादरम्यान भारतात प्रति 10 लाख लोकसंख्येवर संक्रमितांची संख्या सर्वात कमी (101) राहीली आहे. ब्राझील, रशिया, फ्रान्स, इटली, अमेरिका आणि ब्रिटनमध्ये ही संख्या यापेक्षा खुपच जास्त आहे.

दोन लसींना दिली आपत्कालीन वापराची मंजूरी
दरम्यान, औषध नियंत्रकांनी ऑक्सफोर्डची कोविड-19 लस कोविशील्ड आणि भारत बायोटेकची स्वदेशी कोव्हॅक्सीनला देशात मर्यादित वापराला मंजूरी दिली आहे. भारताचे औषध महानियंत्रक म्हणजे डीसीजीआय यांच्या निर्णयाने देशात कोरोनाच्या विरूद्ध व्यापक लसीकरण अभियानाचा मार्ग मोकळा झाला आहे. डीसीजीआयचे म्हणणे आहे की, सीडीएससीओच्या तज्ज्ञ समितीच्या शिफारसी लक्षात घेऊन व्हॅक्सीनच्या आपत्कालिन वापराला मंजूरी दिली आहे.