देशात होणार बॅटरी स्टोरेजचे उत्पादन, धावतील इलेक्ट्रिक वाहने आणि भासणार नाही इंधनाची आवश्यकता – केंद्रीय मंत्री जावडेकर

नवी दिल्ली : वृत्त संस्था – केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर बुधवारी पत्रकार परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॅबिनेट बैठकीत घेण्यात आलेल्या महत्वाच्या निर्णयांबाबत सविस्तर माहिती दिली. त्यांनी सांगितले, स्टोरेज उत्पादनाला प्रोत्साहन देणार्‍या 18,100 कोटी रुपयांच्या प्रॉडक्शन लिंक इन्सेटिव्हला आज कॅबिनेटने मंजूरी दिली आहे. यातून 50,000 मेगावॅटचे उत्पादन भारतात वाढण्याचा अंदाज आहे.

केंद्रीय मंत्र्यांनी सांगितले की, आज पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली आणि आतापर्यंत आयात करण्यात येणार्‍या बॅटरी स्टोरेजचे उत्पादन देशातच करण्यासंबंधी निर्णय घेण्यात आला. त्यांनी सांगितले की, आज बॅटरी स्टोरेजबाबत घेतलेला निर्णय आत्मनिर्भर भारत आणि मेक इन इंडियाचा परिणाम आहे. जावडेकर यांनी यास विन विन फार्म्युला म्हटले.

जावडेकर यांनी बॅटरी स्टोरेज निर्मिती देशात झाल्याने होणार्‍या फायद्यांचा सुद्धा उल्लेख केला. ते म्हणाले, बॅटरी स्टोरेज वाढावे यासाठी आम्ही 20 हजारचे बॅटरी स्टोरेज बाहेरून आयात करतो, परंतु आता पीएलआयच्या अंतर्गत याचे उत्पादन देशात करण्यात येईल. यानंतर मोठ्या प्रमाणात इंधन आयात सुद्धा कमी करता येईल. 45 हजार कोटींची देशात गुंतवणूक येईल. या योजनेतून इलेक्ट्रिकल व्हेईकल योजनेला सुद्धा लाभ होईल.

जावडेकर म्हणाले, आपण जेव्हा बॅटरी स्टोरेजचा वापर करू तेव्हा कोळसा वाचेल. भारत 20 हजार कोटी रुपये बॅटरीच्या आयातीवर खर्च करतो. परंतु देशातच याचे उत्पादन झाल्याने इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन मिळेल. या बॅटरी स्टोरेजचे उत्पादन करणार्‍या कंपन्यांना 18 हजार कोटी रुपयांचा इन्सेंटिव्ह मिळेल.

इलेक्ट्रिक वाहनात केला जातो वापर
अ‍ॅडव्हान्स केमिस्ट्री सेलने एनर्जीला केमिकल फॉर्ममध्ये स्टोअर केले जाते. याचा वापर इलेक्ट्रिक केला जातो.’