Pune : भारतीय लष्कराला मिळाले 217 नवे अधिकारी, NDA मध्ये झाली पासिंग आऊट परेड

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्रातील पुणे येथे नॅशनल डिफन्स अकॅडमीच्या 139 व्या कोर्सच्या 217 कॅडेट्सची पासिंग आऊट परेड झाली. या परेडची सलामी हवाई दल प्रमुख आरकेएस भदौरिया यांनी स्वीकारली.

नॅशनल डिफेन्स अकॅडमीने शनिवारी 139 व्या कोर्सच्या 217 कॅडेट्ससाठी पासिंग आऊट परेड आयोजित केली होती. या सर्वांनी शुक्रवारच्या दीक्षांत सोहळ्यात जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (जेएनयू) कडून आपली डिग्री प्राप्त केली.

217 पासिंग कॅडेट्समध्ये सायन्स स्ट्रीममध्ये 49 कॅडेट्स, कम्प्यूटर सायन्स स्ट्रीमध्ये 113 कॅडेट्स आणि आर्टस स्ट्रीमध्ये 55 कॅडेट्सचा सहभाग आहे. मित्र राष्ट्रांमधील बारा परदेशी कॅडेटला सुद्धा डिग्री प्रदान करण्यात आली.

बटालियन कॅडेट एज्युटंट धनंजय जसरोटियाने कमांडंटचा सिल्व्हर मेडल आणि चीफ ऑफ द एयर स्टाफ (सीएएस) ट्रॉफीसाठी आर्टस स्ट्रीममध्ये पहिले स्थान पटकावले आणि स्क्वाड्रन कॅडेट कॅप्टन सावन मानने बीटेक स्ट्रीममध्ये पहिले स्थान पटकावून कमांडंटचे सिल्व्हर मेडल आणि अ‍ॅडमिरल ओएस डॉसनची ट्रॉफी जिंकली.

कॅडेट क्वार्टरमास्टर सार्जंट अर्शित कपूरने कमांडंटचे रजत पदक आणि सायन्स स्ट्रीममध्ये प्रथम स्थानावर असल्याने पायदळ लष्करप्रमुख (सीओएएस) ट्रॉफी जिंकली. स्क्वाड्रन कॅडेट कॅप्टन पारुल यादवने कम्प्यूटर सायन्समध्ये पहिल्या स्थानावर असल्याने कमांडंटचे सिल्व्हर मेडल आणि चीफ ऑफ नेव्हल स्टाफ (सीएनएस) ट्रॉफी जिंकली.

बीटेक कोर्सच्या चौथी बॅच, ज्यामध्ये 45 नौसैनिक कॅडेट आणि 35 हवाईदल कॅडेट सहभागी आहेत, यांना कोर्स पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र मिळाले. ते आपल्या संबंधित अकॅडमीमध्ये आपला बीटेकचा अभ्यासक्रम चौथ्या वर्षी जारी ठेवतील.