ज्येष्ठांना कोविडची लस घेण्यासाठी द्यावी लागतील ‘ही’ कागदपत्रे, गंभीर आजाराने ग्रस्त लोकांसाठी असेल ‘ही’ अट, जाणून घ्या

नवी दिल्ली : 60 वर्षापेक्षा जास्त वयाचे ज्येष्ठ आणि 45 ते 60 वर्षादरम्यानच्या गंभीर आजाराने ग्रस्त लोकांना कोरोना व्हॅक्सीन देण्याचे अनेक पर्याय उपलब्ध होतील. ते स्वत:च कोविन प्लॅटफार्मवर रजिस्टेशन करून व्हॅक्सीन घेण्याचा दिवस आणि ठिकाण निवडू शकतात. अगोदर नोंदणी करू न शकणारे ज्येष्ठ आपल्या जवळच्या व्हॅक्सीन सेंटरमध्ये जाऊन ऑनलाइन नोंदणी करून व्हॅक्सीन घेऊ शकतात. याशिवाय आशा कार्यकर्ता आणि अन्य आरोग्य कर्मचार्‍यांवर सुद्धा आपआपल्या भागात राहणार्‍या ज्येष्ठांचा शोध घेऊन त्यांना व्हॅक्सीन सेंटरवर आणण्याची जबाबदारी असेल.

येथे उघडणार व्हॅक्सीन सेंटर
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्यांचे आरोग्य सचिव आणि नॅशनल हेल्थ मिशनच्या प्रमुखांना एक मार्चपासून सुरू होणार्‍या कोरोनाच्या मोठ्या प्रमाणातील लसीकरणाच्या पद्धती बाबत सविस्तर सांगितले आणि त्यांच्या शंकांचे समाधान केले. आरोग्य मंत्रालयानुसार सरकारी व्हॅक्सीन सेंटर प्राथमिक आरोग्य केंद्र, सहयोगी आरोग्य केंद्र, आयुष्मान भारत अंतर्गत येणारी हेल्थ व वेलनेस सेंटर, सब डिव्हिजनल आणि जिल्हा हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये उघडले जाऊ शकतात.

कोरोना गाईड लाइनचे करावे लागेल पालन
अशाच प्रकारे खासगी व्हॅक्सीन सेंटर सीजीएचएस आणि आयुष्मान भारतच्या प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेंतर्गत मान्यता प्राप्त केंद्रांसह राज्यांच्या आरोग्य विमा योजनांच्या अंतर्गत नोंदणीकृत हॉस्पीटलमध्ये उघडले जातील. राज्य सरकारांना पहिल्यांदा खासगी हॉस्पिटलमध्ये सुरू होत असलेल्या लसीकारणादरम्यान कोरोनाच्या गाईड लाइनचे पालन निश्चित करण्यास सांगितले आहे.

आणावी लागतील कागदपत्र
राज्यांना हे सुद्धा सांगण्यात आले आहे की, वयाच्या पडताळणीसाठी लाभार्थ्यांना कोण-कोणती कागदपत्र आणावी लागतील. एका वरिष्ठ अधिकार्‍याने म्हटले की, यासाठी आधार कार्ड आणि मतदार ओळखपत्राशिवाय एखादी अन्य फोटो ओळख दाखवावी लागेल, ज्यामध्ये जन्मतारीख नोंद असेल. वरिष्ठ अधिकार्‍यांनुसार, यापैकी एक कागदपत्र दाखवून सुद्धा लाभार्थी व्हॅक्सीन घेऊ शकतो.

गंभीर आजाराने ग्रस्तांसाठी ही असेल अट
एखाद्या गंभीर आजाराने ग्रस्त 45 ते 60 वर्षादरम्यानच्या वयाच्या लाभार्थींना याशिवाय नोंदणीकृत डॉक्टरद्वारे देण्यात आलेले आजाराचे सर्टिफिकेट द्यावे लागेल. आरोग्य मंत्रालयानुसार, यावेळी हेल्थकेयर किंवा फ्रंटलाइन वर्कर्स सुद्धा व्हॅक्सीन घेऊ शकतील, ज्यांनी अगोदर घेतली नव्हती. परंतु, त्यांचे वय 60 वर्षापेक्षा जास्त किंवा 45 ते 60 वर्षाच्या दरम्यान गंभीर आजाराने ग्रस्त असावे लागेल.

ओळखपत्र दाखवणे आवश्यक
अशा हेल्थकेयर आणि फ्रंटलाइन वर्कर्ससाठी संस्था किंवा कंपनीकडून जारी फोटोसह ओळखपत्र किंवा सर्टिफिकेट दाखवावे लागेल. कोविन प्लॅटफार्मवर नोंदणी असणे आणि पहिला डोस घेताच क्यूआर कोडवर आधारित अस्थायी सर्टिफिकेट आणि दुसरा डोस घेल्यानंतर स्थायी सर्टिफिकेट जारी केले जाईल. लाभार्थ्याच्या मोबाइलवर या सर्टिफिकेटची लिंक पाठवली जाईल, जे सहज डाऊनलोड करता येऊ शकते. व्हॅक्सीन सेंटरवर याची प्रींट आऊट घेण्याची सुविधा असेल.