अमेरिकेचा ‘मोह’ सोडून आता ‘या’ देशाला भारतीयांची स्थायिक होण्यास ‘पसंती’, जाणून घ्या ‘कारण’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनल्यानंतर, अमेरिकेतील केवळ भारतीयांनाच नाहीतर जगातील इतर नागरिकांना धक्का बसला आहे. नागरिकांना व्हिसा संबंधित समस्यांना सामोरे जावे लागत आहे. यात एच-१ बी व्हिसा मिळण्यात वेळ लागत आहे. तर काहींना हा व्हिसाच मिळत नाही. तसंच ग्रीन कार्ड मिळणे किंवा पती किंवा पत्नीला एच-१ बी व्हीसा मिळत नाहीये, या समस्या मुख्य आहेत. त्यामुळे अमेरिकेत काम करणाऱ्या किंवा कामासाठी जाऊ इच्छित असणाऱ्या भारतीयांसाठी अडचणी येत आहेत. मात्र भारतीयांनी आता यावर मार्ग शोधत एक वेगळा देश निवडला आहे.

कॅनडा या देशाची भारतीयांनी निवड केली आहे. २०१७च्या तुलनेत २०१८मध्ये ५१ टक्क्यांहून अधिक लोकांनी कॅनेडामध्ये स्थायिक झाले आहेत. २०१८ मध्ये ३९,५०० भारतीय नागरिकांना एक्स्प्रेस एन्ट्री स्कीममध्ये कॅनडामध्ये कायमचे वास्तव्य मिळाले आहे.

नुकत्याच जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार २०१८ मध्ये एकूण ९२००० लोक कॅनडामध्ये स्थायिक झाले त्यातील ३९,५०० नागरिक फक्त भारतीय आहे. २०१७ मध्ये ६५,५०० लोक कॅनडामध्ये स्थायिक झाले होते. त्यात २६,३०० लोक फक्त भारताचे होते.

गेल्या काही महिन्यांपासून अमेरिकेने युएस व्हिसावर काही नियमांतर्गत बंदी लावली. त्यात १०-१५ टक्केच लोकांना अमेरिकेत व्हिसा देण्यात येईल. याचा सर्वाधिक प्रभाव हा भारतावर पडला आहे. अमेरिका दरवर्षी ८५,००० लोकांना एच-वन बी व्हिसा देते. यात ७० टक्के लोक भारतीय असायचे. मात्र आता यावर काही मर्यादा आली आहे. त्यामुळे भारतीयांनी त्यांच्यासाठी नवीन पर्याय शोधला आहे. कॅनडा हा भारतीयांसाठी दुसरा पर्याय ठरला आहे. अनेक भारतीयांनी कॅनडामध्ये प्रवेश केला आहे. अनेक व्यावसायिकांनी कॅनडामध्ये स्थायिक होण्याचा निर्णय घेतला आहे.

‘पेनकिलर’ खात असाल तर ‘हे’ नक्की वाचा

‘मेकअप’ रिमूव्हसाठी बदाम तेल उत्तम

ऑफिसमध्ये जास्त वेळ खुर्चीवर बसताय मग बदला ‘या’ सवयी

‘गोड पदार्थ’ खाल्यावर लगेच ‘पाणी’ पिण्याने बिघडते आरोग्य

‘वजन कमी’ करण्यासाठी रात्री जेवत नसाल तर होईल ‘हे’ नुकसान

अंडरआर्म्ससाठी ‘डिओ’  विकत घेताना घ्या ‘ही’ काळजी

शरीराला ऊर्जा देणारी ‘खारीक’ ‘या’ आजारांनांही करते  दूर