National Pension System (NPS) | ‘प्रायव्हेट नोकरी’मध्ये सुद्धा मिळवू शकता पेन्शन, निवृत्तीनंतर होणार नाही पैशांची अडचण; जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – National Pension System (NPS) | निवृत्तीनंतर जेव्हा शरीर साथ देणे बंद करते, नातेवाईक दूर राहू लागतात, अशावेळी केवळ तुमचे पैसेच तुमच्या उपयोगी येतात. म्हणूनच निवृत्तीसाठी सुरूवातीपासून नियोजन केले पाहिजे. केवळ सरकारी नोकरी वाल्यांनाच निवृत्तीनंतर पेन्शन मिळते असे नाही, जर तुम्ही प्रायव्हेट नोकरीत असाल, किंवा एखादा व्यवसाय करत असाल तरी स्वत: निवृत्ती योजना तयार करू शकता. (National Pension System (NPS)

 

निवृत्तीची योजना एक खुपच महत्वाचा भाग आहे. हेच लक्षात घेऊन भारत सरकारने नॅशनल पेन्शन स्कीम – National Pension System (NPS) ची सुरुवात केली. राष्ट्रीय पेन्शन योजना एक प्रकारची पेन्शनसह इन्व्हेस्टमेंट स्कीम आहे. ही स्कीम बाजार आधारित रिटर्नची गॅरंटी देते.

 

NPS एक सरकारी गुंतवणुकीची योजना आहे. ही योजना 2004 मध्ये सरकारी कर्मचार्‍यांसाठी सुरू केली होती. 2009 पासून ती सर्व प्रवर्गातील लोकांसाठी खुली करण्यात आली.

 

सरकारी गुंतवणुक योजना (Investment Plan)
नॅशनल पेन्शन सिस्टम (NPS) एक सरकारी गुंतवणूक योजना आहे. ती पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अ‍ॅथोरिटी रेग्युलेट करते. सर्वप्रथम ही योजना 2004 मध्ये सरकारी कर्मचार्‍यांसाठी सुरू झाली होती. परंतु 2009 मध्ये ही स्कीम सर्व कॅटेगरीच्या लोकांसाठी खुली करण्यात आली. यामध्ये कुणीही व्यक्ती आपल्या नोकरीच्या दरम्यान यामध्ये पेन्शन खाते उघडू शकतो.

 

एनपीएसमध्ये गुंतवणूक करण्याचे वय 18 ते 70 वर्ष आहे. तुम्ही यामध्ये आपल्या सुविधेनुसार, गुंतवणूक करू शकता. एनपीएसचे वैशिष्ट्य हे आहे की, या योजनेचा लाभ निवृत्तीच्या अगोदर सुद्धा घेऊ शकता. योजनेत गुंतवलेल्या रक्कमेचा काही भाग तुम्ही निवृत्तीच्या पूर्वी काढू शकता.

 

निवृत्तीच्या वेळी एकुण जमा रक्कमेच्या 60 टक्के पैसे काढू शकता आणि उर्वरित 40 टक्के रक्कम पेन्शन योजनेत जाईल. या दरम्यान जर एनपीएस अकाऊंट बंद करायचे असेल तर 3 वर्षानंतर खाते बंद करू शकता.

 

तुम्ही एनपीएस खात्यात आपल्या सुविधेनुसार दरमहिना किंवा वार्षिक पैसे जमा करू शकता. तुम्ही 1,000 रुपयांपासून सुद्धा पत्नीच्या नावावर एनपीएस खाते उघडू शकता. 60 वर्षाच्या वयात एनपीएस खाते मॅच्युअर होते.

दोन प्रकारची खाती

नॅशनल पेन्शन स्कीम अंतर्गत दोन प्रकारची खाती उघडता येऊ शकतात.

* टीयर -1 अकाऊंटमध्ये जे पैसे जमा केले जातील ते वेळेपूर्वी काढता येणार नाहीत. जेव्हा योजना पूर्ण होईल तेव्हाच पैसे काढू शकता.

* टीयर – 2 अकाऊंट उघडण्यासाठी टीयर वनचे अकाऊंट होल्डर असणे अनिवार्य आहे.
यामध्ये इच्छेनुसार पैसे जमा किंवा काढू शकता. हे अकाऊंट सर्वांना उघडणे अनिवार्य आहे.

 

National Pension Scheme चे लाभ

– निवृत्तीनंतर पेन्शन मिळेल.

– Annuity च्या खरेदीत गुंतवणुकीवर करात पूर्णपणे सूट मिळेल.

– 50,000 रुपयांपर्यंत अतिरिक्त सूट सेक्शन 80CCE च्या अंतर्गत क्लेम केली जाऊ शकते.

– नॅशनल पेन्शन स्कीम अंतर्गत किमान गुंतवणूक मर्यादा 6000 रुपये आहे.

– किमान गुंतवणूक न केल्यास अकाऊंट फ्रीज केले जाते आणि 100 रुपयांची पेनल्टी लागते.

– गुंतवणुकदाराचा मृत्यू 60 वर्षापूर्वी झाला तर पेन्शनची रक्कम नॉमिनीला दिली जाईल.

– या योजनेंतर्गत जास्त अकाऊंट उघडता येऊ शकत नाहीत.

 

Web Title :- National Pension System (NPS) | national pension system nps interest rate best pension and retirement plan

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Desecration of Shivaji Maharaj Statue | शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना ! कानडी पोलिसांची मराठी भाषिकांविरोधात दडपशाही, मध्यरात्री 27 जणांना अटक, 61 जणांवर FIR

Udayanraje Bhosale | ‘आम्ही कधी कोणाची घरं फोडली नाहीत’ – खासदार उदयनराजे (व्हिडिओ)

Deepali Dhumal | ‘हे तर भाजपने केलेले गलिच्छ राजकारण’, विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ यांची टीका