‘JioFiber’ Plans लॉन्च ! तुमच्या दैनंदिन जीवनावर आणि घर खर्चावर कसा होईल परिणाम, जाणून घ्या

नवी दिल्ली – वृत्तसंस्था – रिलायन्स जीओ कडून औपचारिकरीत्या जिओ फायबर प्लॅन २०१९ आता लाँच केला आहे. त्यामुळे लँडलाईन कनेक्शन, केबल टीव्ही आणि ब्रॉडबँड कनेक्शन ग्राहकांना वेगवेगळे घेण्याची गरज नाही. या तिन्ही सेवा आता एकच झाल्या आहेत. मागच्या १४ ऑगस्ट रोजी रिलायन्स जीओ ने फायबर सेवा सुरु करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर आज ५ सप्टेंबर रोजी २०१९ जीओ फायबर ने टॅरिफ प्लॅन जाहीर केले आहेत.

सेल्युलर सेवांमध्ये आपले वर्चस्व सिद्ध केल्यानंतर जीओ ने आता ऑप्टिकल फायबर, केबल टीव्ही , आणि लँडलाईन क्षेत्रात जबरदस्त प्रवेश केला आहे. या तीन सेवा एकत्र मिळत आहेत. मग आपल्याला प्रश्न पडू शकतो की, तीन ऐवजी एक सेवा घेतली तर आपले पैसे वाचू शकतात का..? यासाठी आपल्याला जिओ फायबर प्लॅन २०१९ सविस्तरपणे समजून घ्यावा लागेल.

टीव्ही किती महाग आहे
जर आपण केबल टीव्ही पाहू इच्छित असाल तर फ्री तू एअर चॅनेल १०० रुपये खर्च करावे लागतात. याशिवाय आपल्या आवडत्या चॅनेल साठी वेगळे शुल्क लागतात. यप्रकारे आपल्याला केबल टीव्ही पाहण्यासाठी महिन्याला २५०-५०० रुपये लागू शकतात. डीटीएच कंपन्यांचे सेट टॉप बॉक्स बसवल्यानंतर महिन्याला ५ ते १० टक्के सूट मिळू शकते. असे असताही पूर्वीसारखे जसे ३०० रुपयांमध्ये सर्व चॅनेल पाहता येत होते तसे पाहता येत नाहीयेत.

ब्रॉडबँड साठी जास्त पैसे खर्च करावे लागतात
फास्ट इंटरनेट ची गरज आज सर्वांनाच आहे. जवळ – जवळ आपल्या सगळ्यांच्या घरी ब्रॉडबँड सेवा घेतलेली असणार. कारण आपण करत असलेले काम मधेच बंद पडू नये म्हणून. त्यासाठी आपल्याला महिन्याला किमान ५०० रुपये खर्च करावे लागतात. एवढ्या कमी चा प्लॅन असल्यामुळे काही वेळेस स्पीड कमी आला तरी आपल्याला अड्जस्ट करावे लागते.

लँडलाईन फोन
मोबाईल फोन च्या वापरामुळे लँडलाईन फोन चा वापर आता कमी झाला आहे. तरीही काही ठिकाणी घरांमध्ये लँडलाईन सुविधा आहेत. जेव्हा कधी नेटवर्क नसेल आणि जास्त वेळ बोलायचे असेल तेव्हा लँडलाईन फोनचा वापर केला जातो. त्यामुळे यावर आपल्याला महिन्याला काही ना काही खर्च करावा लागतोच. हा खर्च कमीत कमी १०० रुपये असू शकतो.

एकूण तुम्ही किती खर्च करता
ब्रॉडबँड जोडणी, केबल कनेक्शन , फोन साठी महिन्याला आपल्याला ७०० ते १००० रुपये एवढा कमीत कमी खर्च येतो. याव्यतिरिक्त वेगवेगळे बिल भरणे कंटाळवाणे असते. टीव्ही चॅनेल आणि ब्रॉडबँड स्पीड सोबत आपल्याला एड्जस्ट करावे लागते. परंतु रिलायन्स जीओ फायबर मध्ये आपल्याला या सर्व सुविधा एका बिलामध्ये मिळणार आहेत. त्या सुद्धा अतिशय स्वस्त दरात. येत्या काळात दुसऱ्या कंपन्या सुद्धा अशा प्रकारचे प्लॅन घेऊन येऊ शकतात जेणेकरून त्यांचे वापरकर्ते कमी होणार नाहीत. तसेच जीओ कडे वळले जाणार नाहीत.

जीओ फायबर साठी किती खर्च येणार
रिलायन्स जीओ ने जीओ फायबर चे प्लॅन ब्रॉंझ, सिल्व्हर, गोल्ड, डायमंड, प्लॅटिनम, आणि टायटेनियम प्रकारांमध्ये सुरु केले आहेत. याचा एकदम बेसिक प्लॅन एका केवळ ६९९ रुपयांमध्ये मिळणार आहे. महिन्याभरासाठीच्या प्लॅन ची जास्तीत जास्त किंमत ८४९९ रुपये असणार आहे. बेसिक प्लॅन मध्ये १०० एमबीपीएस च्या स्पीड सोबत १०० जीबी मुक्त डेटा मिळणार आहे. मोफत व्हॉइस कॉल, टीव्ही व्हिडीओ कॉलिंग आणि कॉन्फ्रेंस ची सुविधा मिळणार आहे. दुसरा प्लॅन ८४९ रुपये चा आहे. यामध्ये १०० एमबीपीएसच्या स्पीड सोबत २०० जीबी डेटा मोफत मिळणार आहे. त्यासोबतच आणखीही इतर सुविधांचा समावेश असेल.

1299 मध्ये 500 जीबी डाटा
जर आपण महिन्याला १३०० रुपयांच्या आसपास खर्च करण्यासाठी तयार असाल तर रिलायन्स २५० एमबीपीएसच्या स्पीड सोबत ५०० जीबी डेटा देण्याचे आश्वासन देत आहे. याव्यतिरिक्त २४९९ चा प्लॅन मध्ये ५०० एमबीपीएस च्या स्पीड सोबत १२५० जीबी डेटा मिळू शकेल. ३९९९ च्या प्लॅन वर १ जीबीपीएस च्या स्पीड ने २५०० जीबी डेटा आणि ८४९९ रुपये प्लॅन मध्ये १ जीबीपीएस डेटा के साथ ५०००जीबी डेटा दिला जाणार आहे.

२५०० चे एक वेळ करावे लागणारे पेमेंट
जीओ फायबर साठी आपल्याला पहिल्या वेळेस २५०० रुपये द्यावे लागणार. यामध्ये १५०० रुपयांचे सिक्योरिटी डिपॉजिचा समावेश आहे. जे तुम्हला परत मिळणार आहेत. याव्यतिरिक्त १००० रुपये परत न मिळणारे इंस्टॉलेशन चार्ज असतील. जे तुम्हाला परत मिळणार नाहीत.

वेलकम ऑफर मध्ये काय मिळेल
जीओ च्या फॉरेव्हर एनुअल प्लॅन च्या माध्यमातून जीओ होम गेटवे , जिओ 4K सेट टॉप बॉक्स, टीव्ही सेट, (गोल्ड प्लॅन च्या वरील प्लॅन साठी आहे ) सोबत ओटीटी अ‍ॅप्स चे सबस्क्रिप्शन मिळणार आहे.

तीन पेक्षा एकच कनेक्शन ठरेल लाभदायक
अगोदरच्या केबल टीव्ही कनेक्शन, ब्रॉडबैंड कनेक्शन, लँडलाईन कनेक्शन च्या तुलनेत जीओ फायबर ची तुलना केल्यास आपल्याला कमी पैश्यात चांगली स्पीड , चांगली सेवा मिळणार आहे. हे विसरू नका की, १२९९ च्या प्लॅन सोबत 4K टीव्ही मोफत मिळणार आहे. याचाच अर्थ या एका कनेक्शन सोबत आपण आपले खूप पैसे बचत करू शकता.

अगोदरपासूनच असे अपेक्षित होते
अगोदरपासूनच असा अंदाज लावला जात होता की, जीओ फायबर च्या प्लॅन्स च्या किमतीची अशी घोषणा अशी असेल जे की, ७०० रुपये प्रति महिन्यापासून १०,००० प्रति महिना अशी असू शकते. असे वर्तवले जात होते की, रिलायन्स जीओ फायबर च्या वापरकर्त्यांना वेलकम ऑफर सोबत मोफत सेट टॉप बॉक्स , स्मार्ट एचडी टीव्ही , ब्रॉडबँड लाडलाईन सारख्या ऑफर दिल्या जाणार आणि अगदी तसेच झाले. रिलायन्स जीओ फायबर च्या अंतर्गत वापरकर्त्यांना हाय स्पीड ब्रॉडबँड सेवेचा लाभ मिळणार आहे.

जाणून घेऊयात, जीओ फायबर वापरकर्त्यांना काय मिळणार

मोफत लँडलाईन कनेक्शन
ग्राहकांना जीओ फायबर मध्ये मोफत लँडलाईन कनेक्शन मिळणार आहे. या लँडलाईन कनेक्शन च्या माध्यमातून वापरकर्ते भारतात सर्व मोबाईल आणि लँडलाईन कनेक्शनवर मोफत कॉल चा आनंद घेऊ शकतात. मागच्या अनेक दिवसांपासून जीओ फायबर च्या सुविधा टेस्टिंग साठी सुरु करण्यात आल्या होत्या. ज्या वापरकर्त्यांकडे अगोदरच कनेक्शन आहे ते लँडलाईन कनेक्शन साठी माय जीओ अँप्स चा वापर करून आवेदन करू शकतात. यावरून आपल्याला समजून येऊ शकते की, रिलायन्स जीओ फायबर च्या अनेक आकर्षक सुविधा भेटणार आहेत.