‘या’ 2 उपायांमुळे कंबरदुखी होईल ‘गायब’, कधीही होणार नाही त्रास, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम –  सतत एका जागी बसून काम केल्याने कंबरेच्या दुखण्याच्या समस्या वाढत असल्याचे दिसून येत आहे. कंबरेवरील मांसपेशींवर जास्त ताणाव पडल्यास कंबरेचा त्रास वाढतो. तसेच जास्त वजन आणि कॅल्शिअमची कमतरता हे देखील कंबरदुखीचे कार असू शकते. कंबरदुखीचा त्रास होत असल्यास दररोज हंसासन आणि मकरासन करावे. नियमित ही आसने केल्यास पाठ आणि कंबरेचे दुखणे कमी होते.

ही आसने करा
हंसासन :
जमीनीवर संतरंजी अंथरुण गुडघ्यावर बसावे. दोन्ही हातांना जमीनीवर ठेवावे. दोन्ही हातांमध्ये १० इंच अतंर ठेवा. गुडघ्यांना पुढच्या बाजूने झुकू द्या. त्यानंतर हळू-हळू दोन्ही हातांच्या आधारे जमीनीपासून संतुलन ठेवून उभे राहा. आता मानेचा भाग पुढे झोकून शरीराला पक्षाचा आकार द्यावा. या स्थितीमध्ये १० ते ३० सेकंद राहावे. ही क्रिया दोन ते तीन वेळेस करावी. सुरूवातीला हा व्यवाम थोडा कठिण वाटला तरी नियमित केल्यास नंतर सोपा वाटतो.

मकरासन : जमीनीवर सतरंजी किंवा मॅट अंथरूण पोटावर झोपावे. पोटावर झोपून अगोदर हनुवटी जमीनीवर ठेवावी. दोन्ही हात छातीखाली ठेवावेत. श्वास आत ओढून एक पाय वर उचलावा. त्यानंतर हळू-हळू पाय जमीनीवर आणावा. पुन्हा हाताचा कोपरा जमीनीवर टेकवून मकरासन स्थितीच झोपावे.