Navi Mumbai ACB Trap | सातबारा उताऱ्यावर नोंद करण्यासाठी 10 हजार रुपये लाचेची मागणी, तलाठ्यावर एसीबीकडून FIR

नवी मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सातबारा उताऱ्यावर नोंद करण्यासाठी 10 हजार रुपये लाच मागणाऱ्या (Demand Bribe) पनवेल तालुक्यातील सजा सुखापुर सिल्लोत्तर येथील तलाठ्यावर नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Navi Mumbai ACB Trap) गुन्हा (FIR) दाखल केला आहे. संजय विष्णू पाटील (वय-55) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तलाठ्याचे नाव आहे. नवी मुंबई एसीबीने (Navi Mumbai ACB Trap) 25 नोव्हेंबर रोजी पडताळणी केली होती. त्यानंतर शुक्रवारी (दि.13) गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत 40 वर्षाच्या व्यक्तीने नवी मुंबई एसीबीकडे (Navi Mumbai ACB Trap) तक्रार केली होती. पथकाने पडताळणी केल्यानंतर तलाठी आणि सध्या मंडळ अधिकारी असलेल्या संजय पाटील (Sanjay Patil) यांच्यावर आज भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (Prevention of Corruption Act) गुन्हा दाखल केला आहे. याबाबत सरकार तर्फे पोलीस निरीक्षक विद्युलता चव्हाण (Police Inspector Vidyulata Chavan) यांनी फिर्याद दिली आहे.

तक्रारदार यांच्या राहत्या घराच्या सातबारा उताऱ्यावर मातोश्री को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे नाव नोंदणी करण्यासाठी तलाठी संजय पाटील यांनी 20 हजार रुपये लाचेची मागणी केली. तडजोडी अंती 10 हजार रुपये देण्याचे ठरले होते.
याबाबत तक्रारदार यांनी नवी मुंबई एसीबीकडे तक्रार केली.
पथकाने 25 नोव्हेंबर 2022 पडताळणी केली असता तलाठी संजय पाटील यांनी लाच मागितल्याचे
निष्पन्न झाल्याने आज गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक ठाणे विभागाचे पोलीस अधीक्षक सुनिल लोखंडे (SP Sunil Lokhande),
अपर पोलीस अधीक्षक अनिल घेरडीकर (Addl SP Anil Gherdikar),
नवी मुंबई एसीबी पोलीस उपअधीक्षक ज्योती देशमुख (DySP Jyoti Deshmukh) यांच्या मार्गदर्शनाखाली
पोलीस निरीक्षक विद्युलता चव्हाण, पोलीस निरीक्षक शिवराज बेंद्रे (Police Inspector Shivraj Bendre),
पोलीस अंमलदार जाधव, पवार, महिला पोलीस नाईक बासरे, चव्हाण, माने, चौलकर यांच्या पथकाने केली.

Web Title :- Navi Mumbai ACB Trap | Demand for 10 thousand rupees bribe to register on Satbara passage, FIR from ACB on Talatha

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Uorfi Javed | ‘उर्फी जिथे दिसेल तिथे तिचं तोंड फोडेनं’ ! चित्रा वाघ यांच्या धमकीनंतर उर्फीची महिला आयोगाकडे धाव

Pune Crime News | आंबेगावात तरुणाचा नायलॉनच्या दोरीने गळा आवळून खून