नवनीत राणांच्या न्यायालयीन खटल्यात रामदेव बाबा असणार साक्षीदार  

अमरावती : पोलीसनामा ऑनलाईन – नवनीत राणा यांच्या जातीच्या प्रमाणपत्रावर आक्षेप घेत अमरावतीचे खासदार आनंदराव अडसूळ यांनी त्यांच्या विरोध सत्र न्यायालयात खटला दाखल केला आहे.या खटल्याची सुनावणी ६ मार्च रोजी घेण्यात आली असून या खटल्याचे साक्षीदार म्हणून योगगुरू रामदेव बाबा आहेत. तसेच अन्य १७ साक्षीदारांचे जबान नोंदवून घेतले जाणार आहे.

नवनीत राणा या अनुसूचित जातीच्या असल्याने त्यांनी अमरावती राखीव लोकसभा मतदार संघातून २०१४ साली झालेल्या निवडणूक लढवली होती. नवनीत राणा या दलित नाहीत त्यांनी खोटे जात प्रमाणपत्र काढून निवडणूक लढवली आहे. असा दावा खासदार आनंदराव अडसूळ यांनी केला, आणि त्यांच्या विरोधात न्यायालयात याचिका दाखल केला. त्याच खटल्याची ६ मार्च रोजी घेण्यात आली आहे.

योगगुरू रामदेव बाबा यांनी नवनीत राणा आणि रवी राणा यांचा विवाह लावला होता. म्हणून त्यांना नवनीत राणा यांनी साक्षीदार बनवले आहे. त्याच प्रमाणे नवनीत राणा यांनी शिक्षण घेतलेल्या पंजाब येथील चमको साहेब खालसा सिनियर सेकंडरी स्कूलच्या मुख्यध्यापकांना देखील या खटल्यात साक्षीदार म्हणून बोलवले आहे.

२०१४ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कडून नवनीत राणा यांनी उमेदवारी केली होती. त्यांच्या विषयी त्यांचे निवडणुकीतील प्रतिस्पर्धी आनंदराव अडसूळ यांनी दिलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे हि निवडणूक गाजली होती. त्यानंतर आनंदराव अडसूळ यांनी नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्रावर आक्षेप घेऊन न्यायालयात याचिका दाखल केली होती.