Navneet Rana-Ravi Rana | राणा दाम्पत्याला न्यायालयाकडून जामीन मंजूर; अखेर 12 दिवसानंतर कोठडीतून सुटका

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Navneet Rana-Ravi Rana | अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) आणि आमदार रवी राणा (MLA Ravi Rana) यांना राजद्रोहाच्या आरोपाखाली अटक (Arrested) करण्यात आले होते. सध्या राणा दाम्पत्य न्यायालयीन कोठडीत होते. दरम्यान जवळपास 12 दिवसांनंतर राणा दाम्पत्याला न्यायालयाचा दिलासा मिळाला आहे. त्यांना आज (बुधवारी) मुंबई सत्र न्यायालयाकडून (Mumbai Sessions Court) जामीन मंजूर करण्यात आला आहे. कोठडीतून सुटका होणार असल्याने अमरावती येथे कार्यकर्त्यांकडून जल्लोष करण्यात येत आहे. (Navneet Rana-Ravi Rana)

 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा पठण (Hanuman Chalisa) करण्याची घोषणा राणा दाम्पत्यांनी केली होती. त्यानंतर अनेक घडामोडींना वेग आला होता. मुंबई पोलिसांनी प्रक्षोभक वक्तव्य प्रकरणी 23 एप्रिलला त्यांच्या खार येथील निवासस्थानातून अटक केली होती. मुंबई सत्र न्यायालयात हजर केल्यानंतर राणा दाम्पत्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. (Navneet Rana-Ravi Rana)

 

त्यानंतर राणा दाम्पत्यांनी मुंबई हाय कोर्टात (Mumbai High Court) त्यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेला गुन्हा रद्द करण्यासाठी धाव घेतली होती. पण, राणा दाम्पत्याला मुंबई हायकोर्टाकडून दिलासा मिळाला नाही. त्यानंतर राणा दाम्पत्यानं मुंबई सत्र न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला होता. न्यायालयाकडून अटी शर्तींसह जामीन मंजूर करण्यात आला आहे.

 

Web Title :- Navneet Rana-Ravi Rana | MLA ravi rana and navneet rana judicial custody court grants bail

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा